Amalner

रात्री 10 ते सकाळी 4 वाजे पर्यंत ट्रॅक्टर द्वारा वाळू उत्खनन…कलम 144 चे सरळ सरळ उल्लंघन

रात्री 10 ते सकाळी 4 वाजे पर्यंत ट्रॅक्टर द्वारा वाळू उत्खनन

कलम 144 चे सरळ सरळ उल्लंघन

प्रा जयश्री साळुंके

अमळनेर येथे सध्या अवैध गौण खनिज वाहतूक या विषयावर कार्यवाही आणि शासकीय नियमानुसार कलम 144 लागू करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी यांनी परिसरातील अवैध गौण खनिज उपसा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे लक्षात घेऊन तसेच सामाजिक कार्यकर्ते संघटना, संस्था यांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारी लक्षात घेऊन स्वतः अनेक ठिकाणी उपस्थित राहून, गौण खनिज उपसा प्रतिबंधक पथक तयार करण्यात आले आहे.

रात्री 10 ते सकाळी 4 वाजे पर्यंत ट्रॅक्टर द्वारा वाळू उत्खनन...कलम 144 चे सरळ सरळ उल्लंघन

यामुळे काही प्रमाणात वाळू उपसा वर जरी नियंत्रण आले असले तरी पाहिजे तसा प्रभाव पडलेला दिसून येत नाही.

रात्री 10 ते सकाळी 4 वाजे पर्यंत ट्रॅक्टर द्वारा वाळू उत्खनन...कलम 144 चे सरळ सरळ उल्लंघन

अमळनेर महसूल खात्या मार्फत छोट्या छोट्या ट्रॉली,ट्रॅकटर पकडले जात आहेत परंतु मोठ्या वाहनामार्फत अजूनही वाळू तस्करी सुरू आहे.
सदरील गोष्ट मौजे.सात्री हद्दीतील बोरी पात्रातून वाळू चोरटे चोरमार्गे निंभोरा -अमळगाव येथून सर्रास कलम -144 चे उल्लंघन करत महसुलाचा माल फस्त करीत आहे.

रात्री 10 ते सकाळी 4 वाजे पर्यंत ट्रॅक्टर द्वारा वाळू उत्खनन...कलम 144 चे सरळ सरळ उल्लंघन

दरम्यान अमळनेर तहसीलदार यांच्या वाहनात रात्री पथक गस्त करत असताना अपघात घडला होता.यामुळे अमळनेर महसूल ची दिशा बदलली आहे का? मनुष्यबळ कमी पडते आहे का?दबाव तंत्राचा उपयोग केला जात आहे का? 144 कलम सुरू असताना वाळू उपसा सुरू आहे याचे कारण काय?असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button