मारवड येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा..!
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे गावठी दारू विक्रेत्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएसआय वैभव पेठकर यांना मारवड येथे माळन नदीकाठी रतन जगन्नाथ पारधी हा
गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार मारवड पोलिसांनी छापा टाकला असता सदर ठिकाणी अवैध दारू आढळून आली. रतन जगन्नाथ पारधी रा. मारवड ह्या व्यक्ती सह सदर ठिकाणावरून 900 रूपये किमतीची दाळ मिळून आल्याने नमुने घेवून उर्वरित माल नष्ट करण्यात आला. पो.कॉ. अनिल राठोड यांच्या फिर्यादीवरून मु.प्रो. अॅक्ट 65 ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






