Faijpur

विद्यापीठ स्तरीय पोवाडा गायन कौशल्य कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

विद्यापीठ स्तरीय पोवाडा गायन कौशल्य कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

फैजपूर:-सलीम पिंजारी

समाजातील सत्य शोधण्याची ताकद पोवाडा गायनात असते असे मत शाहिर शिवाजी पाटील यांनी विद्यापीठ स्तरीय पोवाडा गायन कौशल्य कार्यशाळच्या समारोप समारंभ प्रसंगी मत व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 ते 6 फेब्रुवारी 2020 या दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष- उपप्राचार्य डॉ ए आय भंगाळे, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पिंगला धांडे, उपप्राचार्य डॉ उदय जगताप, शाहिर शिवाजी पाटील व त्यांची सर्व टीम, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ जी जी कोल्हे,डॉ कल्पना पाटील, प्रा पल्लवी भंगाळे, शाहिर बाबुराव मोरे, शाहिर गोकुळ म्हसकर, शाहिर योगेंद्र राऊळ, शाहिर मिलींद शेडगे इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ जी जी कोल्हे यांनी केले. याप्रसंगी शाहीर शिवाजी पाटील म्हणाले, पोवाडा कलेशिवाय उद्याच्या राष्ट्राला पर्याय नाही. पोवाड्यात समाजातील चांगल्या मूल्यांवर भर असतो. पोवाड्या सोबत इतर कौशल्यावर विद्यार्थांनी भर द्यावा ज्या कलेने समाजाचे संवर्धन होईल अशा कलेचे संवर्धन व्हावे. विद्यार्थांनी समाजाचा एक सेवक म्हणून कार्य करावे असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी डॉ पिंगला धांडे यांनी कला कोणत्याही प्रकारची असो त्या कलेकडे अवधान घेतले तर त्यात आवड निर्माण होते. कोणत्याही कलेमध्ये यश संपादन कराचे असेल तर त्यासाठी योग्य ध्येय ठरविणे गरजेचे असते. कोणत्याही लेखनासाठी आपली विचार क्षमता असणे गरजेचे आहे. पोवाडा गायनातून विचारांचा प्रसार होतो, या विचारातून आजच्या तरुणांना योग्य मार्गावर आणण्यासाठी पोवाडे रचण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ ए आय भंगाळे यांनी पोवाडा गायन या कलेला पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वी च्या कला लोक विसरत चालले आहेत. लोक कलेच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य होते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता काचकुटे या विद्यार्थ्यांनीने केले तर आभार डॉ कल्पना पाटील यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ एस व्ही जाधव प्रा सतीश पाटील, प्रा हरीष नेमाडे, डॉ रवी केसुर, प्रा राजेंद्र राजपुत, डॉ ताराचंद सावसाकडे यांनी परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोवाडा गायनाला भरभरून प्रतिसाद दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button