Maharashtra

महावीर जयंतीचा खर्च टाळून औसा ग्रामीण रुग्णालयाला फ्रीज भेट

महावीर जयंतीचा खर्च टाळून औसा ग्रामीण रुग्णालयाला फ्रीज भेट

औसा येथील जैन बांधवांचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा अनोखा उपक्रम

औसा लातुर प्रतिनिधी प्रशांत नेटके

जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर व अहिंसेचे पुजारी भगवान महावीर यांची जयंती औसा येथील जैन बांधवांनी खर्चाला फाटा देऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरी केली.
दरवर्षी भगवान महावीर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन पाळण्याने व सामाजिक अंतर ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आल्यामुळे जयंती सोहळ्याला समाज बांधवांना भाविकांना उपस्थित राहता आले नाही. सर्व समाज बांधवांनी आपापल्या घरी जयंती साजरी केली.

जगभरात सर्वत्र कोरोना हा महाभयंकर आजाराने थैमान घातले असल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन पाळला जात असून त्याच धर्तीवर औसा येथील शेतकरी जैन बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत जयंतीसाठी खर्च होणारा निधी जमा करून त्यातून औसा येथील ग्रामीण रूग्णालयाला २१ हजार रुपये किंमतीचे फ्रीज दिले.
व्हक्सिन, इंजेक्शन आणि विविध लसी ठेवण्यासाठी या फ्रिजचा
रुग्णालयात फायदा होईल अशी माहिती औसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अंगद जाधव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर सी शेख यांनी दिली.
यावेळी जयंती सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला तरी भगवान महावीर यांनी दिलेली शिकवण व अहिंसेचे तत्व सर्व समाज बांधवांनी आचरणात आणावे असा संदेश या निमित्ताने लातुर जिल्ह्याचे आयुष अधिकारी डॉ विकास पाटील,पत्रकार रमेश दुरुगकर ,नितीन विभूते, अमोल कोचट्टा, राजेंद्र दुरुगकर ,प्रकाश दुरुगकर , प्रा किरण दुरुगकर ,रितेश दुरुगकर ,सौ कल्पना दुरुगकर ,हरिष शेटे यांनी सर्व समाज बांधवांना दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button