Amalner

? Breaking..अमळनेर पोलीस निरीक्षक यांच्या गाडीत शॉर्ट सर्किट मुळे लागली आग..

? Breaking..अमळनेर पोलीस निरीक्षक यांच्या गाडीत शॉर्ट सर्किट मुळे लागली आग..

अमळनेर येथील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या वाहनात शॉर्ट सर्किट झाल्या मुळे आग लागली. ही घटना आज सकाळी साधारण पणे सहा वाजेच्या सुमारास घडली.पोलीस निरीक्षक यांचे वाहन त्यांच्या घरा समोर उभे असताना अचानक वायरींमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीत आग लागली परन्तु लगेच ती विझविण्यात आली. सुदैवाने पोलीस निरीक्षक हे गाडी पासून दूर अंतरावर उभे होते. कोणालाही इजा झाली नाही.

परंतु या घटने मुळे पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस विभागात आता अस्तित्वात असलेली सर्व वाहने ही जुनी आहेत.ह्या वाहनांवर रात्रंदिवस कामाचा ताण आहे. ही सर्व वाहने जुनी असल्याने त्यात अनेक प्रकारचे ऑटोमोबाईल काम निघत असते.त्यांचा मेंटेनन्स करणे निव्वळ अशक्य असल्याचे अनेक वेळा अनुभवयास आले आहे. ह्या सर्व जुन्या मशिनरी आणि मेकॅनिझमच्या असल्याने त्यांना त्या प्रमाणात दुरुस्तीची आवश्यकता आहे. अनेक वेळा रात्र भर गस्त घालावी लागते. पुन्हा सकाळी ही वाहने कामावर हजर केली जातात. आता नवीन वाहने पोलीस विभागाला मिळणे आवश्यक असून त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांचे काम सोपे आणि वेगवान होणार आहे. आधीच अमळनेर शहरातील रस्ते हे मंगळ किंवा चंद्रा वरील पृष्ठभागा पेक्षा भयानक आहेत त्यात अश्या गाड्या जर असतील तर अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्यास ही धोका आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button