Maharashtra

भारतीय प्रथम आदिवासी महिलेचा संघर्षातून कुलगुरू पदापर्यंत चां खडतर प्रवास

भारतीय प्रथम आदिवासी महिलेचा संघर्षातून कुलगुरू पदापर्यंत चां खडतर प्रवास

प्रतिनिधी मुबारक तडवी

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी आजही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. परंतु तरीही आदिवासी समाजातील विद्यार्थी उच्च स्थानावर जात आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक सोनाझरीका मिन्झ आदर्श ठरल्या बनल्या आहेत. आदिवासी म्हटले की अजूनही एका संकुचित वृत्तीने पाहिले जाते, परंतु त्यावरही आदिवासी विद्यार्थी मात करतात. असाच प्रकार प्राध्यापक सोनाझरीका मिन्झ यांच्या बाबत पण घडला. इंग्रजी माध्यमातून प्रवेश नाकारल्यामुळे हिंदी माध्यमातून शाळा शिकणाऱ्या आणि पुढेही “तुला गणित जमणार नाही” असे शाळेत गणिताच्या शिक्षकांनी अपमान केल्यावर गणितातच उच्च शिक्षण घेणाऱ्या सोनाझरीका मिन्झ या आदर्श ठरल्या आहेत.
जीवनामध्ये आलेल्या संघर्षाला आव्हान म्हणून कॉम्प्युटर सायन्स शिकून जेएनयू मध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकविणाऱ्या प्राध्यापक सोनाझरीका मिन्झ यांची झारखंड मधील मुरमु विशवविद्यालयाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली आहे. त्या पहिल्या भारतीय आदिवासी महिला कुलगुरू ठरल्या आहेत.
वंचित समाजातील व्यक्तीबाबत नेहमी दुजाभावाची वागणूक वाट्याला येत असते. परंतु कोणताही व्यक्ती कमी नसतो. तरूणांना साधनसामग्री, सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास अनेक तरूण क्षमता विकसित करू शकतात. अशी अनेक उदारहणे आपल्यासमोर आलेली आहेत. जन्माने कोणत्याही जाती-धर्मात जन्मला तरी तो माणूसच आहे. परंतु भारतीय व्यवस्थेला लागलेली जातीव्यवस्थेची कीड मात्र अशा अनेक तरूणांचे भवितव्य अंधकारमय करत आहे. प्रत्येक मानवाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तो त्याची क्षमता निर्माण करेल. परंतु क्षमता दाखविण्या अगोदरच जर हीन वागणूक मिळत असेल, तर यासारखा दुसरा अमानुषपणा असूच शकत नाही.
येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण आदिवासी आणि सर्वच समाजातील गरीब मुलांसाठी आव्हान ठरणार आहे. यातून मोठा विद्यार्थी वर्ग बाहेर फेकला जाणार आहे. एक महिला कुलगुरुपदी पोहोचणे, यासाठी शासकीय सोयीसुविधा सुध्दा महत्वाच्या ठरतात. त्यामुळे येणाऱ्या काळ हा मुलांचे शिक्षण खडतर करणारा ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरणाचे संकट आदिवासी मुलींना पुन्हा शिक्षणापासून वंचित ठेवणारे आहे.
देशाची भरभराट व्हायची असेल तर सर्वच समाजातील मुलामुलींना त्यांच्या सर्व क्षमता विकसित करण्यासाठी संधी आणि लागणारी सर्व साधनसामुग्री उपलब्ध करू द्यावी लागेल. देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी देशातील सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेऊन विकासाची धोरणे आखावी लागतील. येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण पुन्हा गुलामीकडे घेऊ जाणारे आहे. त्यामुळे एक आदिवासी महिला कुलगुरु पदापर्यंत पोहोचवू शकते. तर समाजातील तळागाळातील सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी संधी दिली पाहिजे.
प्राध्यापक सोनाझरीका मिन्झ या जेएनयू शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यांच्या संघर्षमय जीवनाला सलाम! त्याच्या वाटचालीस शुभेच्छा !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button