Amalner: मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून 75 वर्षाची विमलबाई पाटील आजी म्हणते सर तुम्ही फक्त लढ म्हणा
सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या निवासी प्रशिक्षण संदर्भात गडखांब गावामध्ये सहा मीटिंग घेण्यात आल्या या मीटिंगमध्ये गडखांब गावातील महिला व पुरुष शेतकरी यांनी 12 पेक्षाही जास्त नावे प्रशिक्षणाला येणेसाठी दिले पण ऐन वेळेला प्रशिक्षणाला जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सर्व शेतकरी महिला व पुरुषांनी आम्हाला काही अडीच दिवसाच्या प्रशिक्षणासाठी येता येणार नाही असे विमललबाई आजीबाईंना सांगितले आजीबाईंनी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुनील पाटील यांना फोन केला व ही हकीकत सांगितली पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक यांनी आजी कोणीतरी तुमच्यासोबत आले तर बघा नाही तुम्हाला एकटे सुद्धा तूम्ही जरी या प्रशिक्षनाला अला तर तूमच्या माध्यमितूनही गटशेती करणेसाठी आपण गावामध्ये प्रयत्न करू आजीबाईंनी सांगितले की सर कोणी कोणी प्रशिक्षणाला येवो अथवा न योवो गावासाठी मी प्रशिक्षणाला नक्की येईन पण तुम्ही आमच्या गावांमध्ये शेती संदर्भात माहिती देण्यासाठी व फार्मर कप स्पर्धेच्या निवासी प्रशिक्षणा संदर्भात सात आठ वेळा गावात येऊन माहिती दिली सर्व शेतकऱ्यांनी नावे दिली पण आणि वेळेला एवढ्या मोठ्या गावातून एकही प्रशिक्षणाला येत नाही याची मला खूप खंत वाटत आहे खूप वाईट वाटत आहे मग मी काय करू सर आजी काही काळजी करू नका तुम्ही या प्रशिक्षणाला या आजीबाई सकाळीच साडेआठ वाजताच अमळनेरच्या बस स्थानकमध्ये एका आपल्या ऐकण्यातल्या मिनाबाई संजय पाटील यांना आपण पाणी फाऊंडेशनच्या निवासी प्रशिक्षणाला जायचं आहे असे रात्रीच त्यांनी सांगितले व त्या सकाळी दोघेही सोबत आल्यावरती सुद्धा घडलेला प्रकार तालुका समन्वयक यांना सांगितले सर एवढ्या मोठ्या आमच्या गावात एवढ्या लोकांनी नावे दिली आणि ऐन वेळेला एक सुद्धा येत नव्हता मी कशीबशी तुम्ही मला आधार दिल्यावर ती या मीना बाईला सोबत घेऊन प्रशिक्षणासाठी आली आहे हे पाणी फाउंडेशनच्या तालुकासमन्वयकाना खूप चांगले वाटले थोड्याच वेळात बस आली व इतर गावातील निवासी प्रशिक्षणराठी जाणारे सर्व शेतकरी सुद्धा आले बस जळगाव येथे निवासी प्रशिक्षणासाठी पोहोचली आजींचे व इतर सहकारी यांचे पाणी फाउंडेशन टीमने खूप चांगल्या पद्धतीने पाय धुवून औक्षन करून स्वागत केले सर्वाना सरबत दिला व प्रशिक्षण ठिकाणी पोहोचताच पाणी फाउंडेशन टीमने टोपी पेन वही पिशवी सर्व साहित्य देऊन प्रशिक्षण सेंटर मध्ये स्वागत केले आजीबाईंना त्या ठिकाणीही इतर गावातून आलेले चार ते सात आठ व्यक्ती पाहून आपल्या गावातले फक्त आपण दोनच महिला आलो आहे याची खंत वाटत होती आजींनी ते देखील खंत तालुका समन्वयकांना बोलून दाखवली तालूका समन्वयकानी आजी आता कुणाचही विचार करू नका तुम्ही प्रशिक्षणासाठी आला आहात प्रशिक्षणामध्ये चांगला सहभाग घ्या शेती संदर्भात सर्व ज्ञान घ्या हसत खेळत शिका व प्रत्येक गोष्टीमध्ये हिरीरिने सहभाग घ्या ही विनंती केल्यानंतर आजीबाईंनी सुरुवातीपासूनच ओळख खेळ पासून ते प्रत्येक सञामध्ये मग बीज प्रक्रिया असो खेळ असो किंवा कोणतेही प्रशिक्षणातील करावयाची टाक्स असो त्यामध्ये आजी अगदी हिरिरीने सहभाग घेत असतात आजी प्रत्येक गोष्ट या महत्त्वाच्या वाटतात त्या वहीमध्ये टिपून घेत असत तसेच ज्या ज्या ठिकाणी आजींना शंका वाटते त्या संदर्भात प्रशिक्षकांना आजी प्रश्न सुद्धा विचारत असत अशा पद्धतीने निवासी प्रशिक्षण आजींनी खूप सुंदर पद्धतीने घेतले व आजी गावी आल्या गावी येतानाच आजींनी पाणी फाउंडेशनच्या तालुका समन्वयकांना सर तुम्ही आम्हाला साथ दिली तर आम्ही नक्कीच गावामध्ये गट बनवू मी निमञक गट बनवते पन पूर्ण गट बनवनेसाठी आम्ही सांगेल त्यावेळेला तुम्हाला आमच्या गावात यावे लागेल तालुका समन्वयक यांनी त्यांना काही काळजी करू नका तुम्ही ज्या ज्या वेळेला सांगेल त्या त्या वेळेला आपल्या गडखांब गावी येऊन तुम्ही सांगेल त्या ठिकाणी शेतकरी बंधू-भगिनींना माहिती देऊ असे सांगितले अजिनी प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर त्याच दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या संबंधित असणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींना प्रशिक्षणामध्ये आपणास पाणी फाउंडेशन च्या टीमने काय काय शिकवले व आपण कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने शेती पिकवू शकतो कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे काढू शकतो विषमुक्त माल कशा पद्धतीने पिकवू शकतो तसेच फार्मर कप स्पर्धेमध्ये आपण बक्षीस देखील कसे जिंकू शकतो हे आपल्या आपल्या परीने समजून सांगितले व पाणी फाउंडेशनचे सर येतील व आपल्या सर्वांना फार्मर कप स्पर्धे संदर्भात अतिरिक्त माहिती तुम्ही मिटींगला याल का असे विचारले आजी एवढी समजून सांगते म्हणल्यानंतर बऱ्याच महिलांनी व पुरुषांनी मिटींगला येण्यासाठी होकार दिला आजींनी तिसऱ्याच दिवशी पाणी फाउंडेशन तालुकासमन्वयकांना फोन करून मीटिंग घेण्याचे ठरवले आहे सर तुम्ही ठरलेल्या वेळी मीटिंगसाठी आम्ही शेतकऱ्यांना एकत्रित बोलून सर्व तयारी करून ठेवते पाणी फाउंडेशनच्या तालुकासमन्वयक यांनी ठरल्याप्रमाणे फार्मर कप स्पर्धे संदर्भात कापूस पीक मका पिका संदर्भात अमळनेर तालुक्यामध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती केली व शेतीवरचा वाढणारा खर्च कमी कसा केला कमी खर्चात चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतकऱ्यांनी कसे घेतले विषमुक्त माल कसा पिकवला व तालुक्यामध्ये महिला व पुरुष गटाना कसे पद्धतीने महाला व पूरूष यांनी बक्षिस देखील जिंकली या संदर्भात माहिती दिली अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित बसून अनेक शंका कूशंका विचारल्या पण लगेच काही गट बनवण्यासाठी शेतकरी तयार होत नव्हते पण विमल आजी या खूप प्रयत्नवादी होत्या त्यांना प्रशिक्षणातून खूप मोठी प्रेरणा व ऊर्जा मिळाली होती व त्यांनी पुन्हा सर आपल्या गटामध्ये शेतकरी येण्यासाठी नकार देत आहेत असे कुठे शेती होती का असे एकत्रित येऊन कुठे काम चालते का असे अनेक नाना प्रकारची कारणे सांगत आहेत सर काय करायचे आता आपण तालुका समन्वयकांनी अक्कांना आधार दिला आक्का तूम्ही नाराज होऊ नका काळजी करू नका आपण आणखीन चांगल्या शेतकरी महिला व पुरुषांच्या पर्यंत पोहचलो तर नक्की गट बनतिल तुम्ही फक्त शेतकरी याची मीटिंग घ्या असे सांगितले अशा तीन ते चार मीटिंग अक्काने वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेतल्या होत्या सर्व महिला पुरुष यांना तालुका समन्वयक यांनी फार्म स्पर्धेत संदर्भात गट शेती संदर्भात त्याचे फायदे तोटे सर्व समजून सांगितले त्यानंतर गटामध्ये येण्यासाठी बरेच शेतकरी तयार झाले पण या एवढ्या कालावधीमध्ये विमान अक्कांनी मात्र गाव पिंजून काढले होते अक्का दिसेल त्याला फार्मर कप स्पर्धा गट शेती संदर्भात माहिती देत असत चार दिवस झाले की लगेच मीटिंग घेत असत हे सर्व करत असतानाच विमान अक्का यांची कौटूबिक परिस्थिती तालूका समन्वयकांनी जाणून घेतली विमाल अक्का या एकट्याच गेली अनेक वर्ष राहत आहेत त्या विधवा आहेत एकट्याचा राहतात त्या आपल्या शेतीमध्ये जमेल त्या परीने काम करत असतात पण हे काम करत असतानाच त्या शेतकरी व बचत गटातील अनेक महिलांना मदत देखील करत असतात तसेच त्यांचा स्वभाव साधा भोळा मनमिळावू व इतर लोकांना मदत करण्याचा आहे याची परिपूर्ण जाणीव झाली अक्काची तळमळ धडपड पाहून पाणी फाउंडेशन च्या टीमनेही अक्कांना लागेल त्यावेळी मदत करण्याचे ठरवले आक्का सांगेल त्या ठिकाणी मीटिंग घेतल्या आक्कानी लोकांच्या मीटिंगच्या माध्यमातून बळीराजा महिला शेतकरी गट व राजे शेतकरी गट अखेल बनवलाच मग विमलअक्का यांना खूप समाधान वाटले पण विमलअक्का यांना इतर गटांनी जसे चांगले काम केले जशी चांगली एकी दिसून येते तशी आपल्या गटामध्ये लोक सहजासहजी काम करण्यासाठी तयार होत नाहीत असे लक्षात आले ही सर्व हकीगत अक्काने तालुका समन्वयक यांना सांगितल्यानंतर गटातील शेतकऱ्यांना इतर गटातील शेतकरी हे कशा पद्धतीने काम करत आहेत कशा पद्धतीने त्यांनी अनेक अडीअडचणी वरती मात केली याची माहिती दिली व स्टोरी देखील दाखवली व त्यांना विनंती केली की जर 75 वर्षाची आजी गट शेती करू शकते इतर महिला गट शेती करू शकतात तर आपण देखील चांगल्या पद्धतीने गटामध्ये काम करू शकता हे काम केले तरच आपला गट चांगला होईल व गटातील व्यक्तीच्या माध्यमातून शेतीमध्ये भेडसावणार्या अनेक समस्या कमी करता येते गटातील शेतकरी यांना हे पटले पण काम करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही अशातच बियाणे खरेदीची वेळ आली बियाणे खरेदी करण्यासंदर्भात गटाची मीटिंग घेतली व गटाने एकत्रित बियाने खरेदी केले तर त्या संदर्भात फायदे सांगितले हे सर्व फायदे गटातील काही शेतकरी यांच्या लक्षात आले त्यांनी बियाणे एकत्रित खरेदी करण्यासाठी होकार दिला या सर्व व्यक्तींचे एकत्रित पैसे जमा करण्याची जबाबदारी कोण घेणार आहे शेतकऱ्यांना विचारलं असतं कोणीही जबाबदारी घेण्यासाठी तयार होईना त्याच वेळेला विमल आक्कानी मी सर्वांचे गटातील पैसे एकत्रित करण्याची जबाबदारी घेईन असे सांगितले व अक्कांनी दोन दिवसांमध्ये गटातील सर्व शेतकरी यांचे बियाणे खरेदीचे पैसे एकत्रित केले पन दोन शेतकरी महिला यांच्याकडे पैसे नव्हते स्वतः त्या दोन शेतकरी महिलांचे पैसे देखील अक्कानी स्वतःच घातले व अमळनेर तालुक्यातील दहा गटातील शेतकरी यांचेसोब एकत्रित बियाणे खरेदी केले त्यामध्ये विमल अक्कांनी खूप प्रेरणादायी कार्य केले या कार्यामुळे गटातील शेतकरी यांच्यामध्ये आपण आजपर्यंत कधीच एकत्रित बायाने खरेदी न केल्याने आपल्याला असे पैसे कधीच वाचवता आले नाही हे शेतकरी यांच्या लक्षात आले व शेतकरी यांचे नकारात्मकता सकारातेकडे बदलण्यास सुरुवात झाली व या गोष्टीमुळे अक्कांना सुद्धा प्रेरणा मिळाली व आपणही आपल्या गटाच्या माध्यमातून चांगले काही करू शकतो याचा आत्मविश्वास वाढला लगेचच मला काही पाणी फाउंडेशनच्या टीमच्या माध्यमातून मीटिंग घेऊन दशपर्णी अर्क संदर्भात गटाला सविस्तर माहिती दिली व आपण हा दशपर्णी अर्क गटाच्या बनवायचा का असे विचारले असता गटातील काहिक शेतकरी बनवूया असे म्हणाले पण दशपर्णी अर्क बनवण्यासाठी पुढे कोणीही यायला तयार नव्हते अशा वेळेला सुद्धा विमल अक्का यांनी गटाचे दशपर्णी अर्क बनवण्याचे नेतृत्व स्वीकारले हे सर्व करत असतानाच दशपर्णी अर्क बनवण्यासाठी एका प्लास्टिकच्या चांगल्या ड्रम ची आवश्यकता होती पण ते कोणीही देण्यासाठी तयार नव्हते अशा वेळेत विमाल आक्का यांनी तो नवीन 200 लिटर क्षमतेचा ड्रम स्वता खरेदी केला गटातील बऱ्याचशा महिलांना घेऊन त्यांनी एकत्रित येऊन दशपर्णी अर्क सुद्धा बनवला अशा अनेक अडचणी वरती विमल अक्का स्वतः धाडसाने पाणी फाउंडेशन सांगेल ते जबाबदारी घेऊन स्वतः झोकून घेऊन गटामध्ये काम करू लागल्या पण आक्कांचा मोबाईल हा साधा होता पाणी फाउंडेशन टीम ज्या काही गोष्टी सांगेल त्या मीटिंगमध्येच आक्का पर्यंत पोहोचत असत ते ऐकू अक्कांना खूप चांगले वाटत असे पाणी फाउंडेशन च्या फार्मर कप स्पर्धेचे जे काही आपण काम करतो त्याचे फोटो घेणे तसेच sop निवड करणे व शेती शाळेमध्ये सहभागी होण्यासाठी अँड्रॉइड मोबाईलची खूप महत्त्वाची गरज आहे हे अक्कांच्या लक्षात आले अक्कांनी लगेचच आपल्या साठवणीतील पैसे काढून नऊ हजार रुपयाचा मोबाईल खरेदी केला अता साधा फोन वापरणारी अक्का स्मार्ट फोन वापरू लागली आक्काला लोक मोठा मोबाईल वापरते म्हणून चिडवू लागले अक्काकडे अता मोठा फोन असलेमूळे मिटींगचे फोटो तसेच दशपर्णी अर्क ढवळतानाचे फोटो स्वतः ग्रुप वरती कशा पद्धतीने पाठवायचे हे पाणी फाउंडेशन च्या टीमकडून समजून घेतले व साधा छोटा मोबाईल सांभाळणाऱ्या अक्काने लगेचच अँड्रॉइड मोबाईल देखील शिकून घेतला व आपल्या सर्व कामाचे फोटो अक्का अगदी उत्स्फूर्तपणे ग्रुप वरती पाठवत असतात अशातच गटाच्या माध्यमातून मीटिंग घेऊन निंबोळी अर्क बनवण्यासाठी गटातील सर्व शेतकरी महिला यांना निंबोळी वेचण्यास आवाहन केले गटातील सर्व शेतकऱ्यांनी लगेचच निंबोळी वेचल्या यानंतर आक्कानी गटाच्या एसओ पी निवडीची मीटिंग घेतली व त्यामध्ये गटाच्या माध्यमातून कापूस पिकामध्ये करावयाच्या एसओपी पाणी फाउंडेशन टीम च्या माध्यमातून समजून घेतल्या त्याच बरोबर गटातील शेतकरी यांना अक्का विनंती करून आपण जे काही शेतामध्ये काम करत आहे याचे फोटो काढण्यासाठी आठवणीने सांगत होत्या पण हे गटातील सर्व शेतकरी यांना काही समजत नाही मग अक्का स्वतः त्यांना आपले काम करत असताना फोटो कशा पद्धतीने घ्यावयाचे याची माहिती देऊ लागल्या पण गटातील शेतकऱ्यांना ह्या फोटोचे महत्त्व सहजासहजी लक्षात येत नव्हते किंवा हे फोटो कसे काढायचे हे समजत नव्हते अशाच वेळेला अक्का यांनी स्वतः पाणी फाउंडेशन टीम ची मदत घेऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जा शेताच्या लोकेशनचे फोटो देखील घेतले एवढ्या वरतीच विमाल अक्का थांबतील तर कशा त्यांना फार्मर कप स्पर्धेमध्ये करावयाच्या विविध कामांची गोडी खूप चांगल्या पद्धतीने लागली होती सामाजिक कार्य करण्यासाठी गावातील पाणलोट्याच्या नेतृत्व करणाऱ्या दहा विहिरींचे पानिपातळिचे मोजमाप करण्याचे सुद्धा नियोजन केले व या विहिरींच्या पाणीपातीचे मोजमाप देखील केले त्याचबरोबर ते विमल आक्का यांनी गटातील शेतकरी यांची एकत्रित चिकट सापळे खरेदी करण्यासाठी पाणी फाउंडेशन टीमच्या माध्यमातून मीटिंग घेतली व गटातील सर्व शेतकरी यांनी मीटिंग नंतर एकत्रित चिकटसापळे खरेदी करण्याचा निर्णय घेतला मार्केटमध्ये 130 ते दीडशे रुपयाला मिळणारे चिकटसापळे गटाच्या माध्यमातून 65 रुपयाला एक पाकीट खरेदी केले त्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाचवले त्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यामध्ये विमल अक्का यांनी यांनी गटाच्या माध्यमातून बायोमिक्स खरेदीसाठी सुद्धा पैसे संकलित केले प्रत्येक आठवड्याला का गटाची मीटिंग घेतात एक निर्णय गटातील सर्व शेतकऱ्यांना सांगतात व त्यावर ती लगेचच अंमलबजावणी गटाच्या माध्यमातून केली जाते अशाच पद्धतीने आता ट्रायको कार्ड खरेदीसाठी सुद्धा गटाच्या माध्यमातून पैसे संकलित केले गेले आहेत अशी एकच नाही तर उन्हात मशागत करणे माती अडचण खत करणे बियाणे एकत्रित खरेदी करणे जैविक बीज प्रक्रिया करणे एकत्रित चिकट सापळे खरेदी करणे एकत्रित बियाणे खरेदी करणे दशपर्णी अर्क निंबोळी अर्क बनवणे पक्षी थांबे व ट्रायकोकार्ड बायोमिक्स अशी विविध जैविक औषध सुद्धा गटाच्या माध्यमातून खरेदी करण्याचे कामे युद्ध पातळीवरती सुरू आहेत अशा अवघड वाटणाऱ्या अनेक जबाबदारी स्वताच्या खांद्यावरती वयाच्या अगदी 75 मध्ये सुद्धा विमल अक्का अगदी हिरीरीने पार पाडतआहेत तसेच आक्का प्रत्येक मिटीग वेळी सर्व शेतकरी महाला पूरूष यांना आवर्जून चहा प्रेत्येक मिटीग वेळी स्वाता देतात त्यांच्या या प्रयत्न वादी जिद्दी व धाडसी कर्तव्य तत्पर सेवाभावी दातृत्ववान बान्यास पाणी फाउंडेशनचा सलाम..






