Pandharpur

पंढरपूर नगरपालिकेच्या कामांचे उद्घाटन म्हणजे कुडमुडे वाजवुन जणतेच्या पैशाची लुटच.सचिव नागेश पवार आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा..

पंढरपूर नगरपालिकेच्या कामांचे उद्घाटन म्हणजे कुडमुडे वाजवुन जणतेच्या पैशाची लुटच.सचिव नागेश पवार आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा..

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर नगरपालिकेच्या नेते यांचे राजकारण म्हणजे कुडमुडे वाजवुन जणतेच्या पैशाची लुट करणे व स्वतःची विधानपरिषदेची पोळी भाजणे हेच आहे.मला या नेते मंडळी यांना विचारावयाचे आहे की,आपण नेहमीच सांगता की आम्ही सुवर्ण जयंती नगरउत्थान योजना भुयारी गटार योजणा राबवीली. खरे आहे हे..पण या योजणेचे टेंडर जे भरले(मुळ टेंडर रक्कम आहे 57,26,17,456) आणि हे टेंडर 9% जादा दराणे म्हणजे( 62,41,53,027)म्हणजे निवीदा रक्कमेच्या पाच कोटी जास्त दराने काढले ते कोणासाठी,या आख्या जगामध्ये खिलारे इनफ्रा शिवाया कोणीच ठेकेदार नव्हते का,आणि आपण जे अंदाजपत्रक जे केले हे अंदाज पत्रक वस्तु निष्ठ परिस्थीतीवर आधारीत नव्हतेच,आणि जर निवेदीमध्ये ज्यादा दराने काम देते वेळी कोणाची परवानगी घेतली तुम्ही, तुम्हाला जरा सुध्दा वाटले नाही का आपल्या नगरपालिकेचा पैसा हा जणतेचा पैसा आहे हा,यामधुन फक्त हेच सिद्ध होते की, नगरपालिका म्हणजे जादा दराने टेंडर काढुन ठेकेदारा मार्फत ,जणतेच्या पैशावर डल्ला मारणे…बर ठीक आहे तुम्ही खुप हुशार आहात खुप संस्था चालविण्याचा अनुभव आहे,तुम्ही ठेकेदार व अधिकारी यांचे कडुन चांगली कामे करुन घेता , मग कुंभार गल्लीत ड्रेनेज ची लाईन रोजच का चाॅकप होते , आता तेथे रस्ते चे टेंडर काढले आहे ,मग भविष्यात काय पुन्हा खोदाई,पण आपण व अधिकारी यांनी आजतागायत सदर ठेकेदाराला जाब विचारला नाही.तसेच आपण MLDT STP देखभाल दुरुस्ती चे काम हे खिलारे इनफ्रा लाच दिले,सदर निवीदा ही 1वर्षे मुद्दतीची(निवीदा रक्कम 9000000 रु) असताना ती पाच वर्ष मुद्दतीची केली याबाबत आपण वरिष्ठांची परवानगी घेतलीच नाही ,आणि अधिकारी यांना पण त्याची अवश्यकता वाटली नाही.नगरपालिकेचा प्रत्येक CEO हा हुशार असतो त्याला वैधानीक अधिकार असतात,मग या अधिकारी यांनी ऐवढे जादादराने निवीदा काढल्याच कशा हा खरा प्रश्न आहे.सध्या चालु वर्षी नगरपालिकेचे कचरा उचलनेचे टेंडर जाहीर केले याची किमंत आहे 91408777 एवढी यासुध्दा टेंडर मध्ये खाबुगीरी आहे,अधिकारी, नेते हे सर्व मिळून जणतेचा पैसा लाटत आहेत .हे यावरुन सिध्द होते,आम्ही अधिकारी यांचेवर चांगले लक्ष ठेऊन आहे,ते कशा पध्दतीने भ्रष्टाचार करत आहेत,या सर्व बेकायदेशीर गोष्टींवर एक प्रशासक म्हणुन अधिकारी यांचे कंट्रोल असते,अधिकारी यांना विशेष अधिकार असतात मगते का त्याचा वापर करत नाहीत?ते का जणतेचा पैशाची बचत करत नाहीत?या सर्व बाबींचा विचार करता सर्व जणता जनार्दन यांनी जागृत झाले पाहिजे,निवडनुकांसारखा लोकशाहीचा सण साजरा केला पाहिजे,आम आदमी पार्टी प्रत्येक नागरीकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, आम आदमी पार्टी पंढरपूर नगरपालिकेची निवडणुक लढविणारच आहे, भ्रष्टाचारी डल्ला मारु नेतेंचा पराभवच करणार आहे,तरी या सारखे अनेक भ्रष्टाचार उघड होणार आहेत, जणतेचे पण डोळे मोठे होतील, विठुरायाच्या पंढरपुरच्या नगरपालीकेचा भ्रष्टाचार पाहुण,तरी सर्व तमाम नागरिकांना एकच विनंती आहे की आम आदमी पार्टी बरोबर निवडनुकांमध्ये सहभागी व्हा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button