दिल्ली येथील भडकाऊ भाषणे करून दंगल घडवणाऱ्या दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा!!
शेर-हिंद शहीद टिपूसुल्तान संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन!!
निलंगा- लातुर प्रतिनिधी:- प्रशांतनेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:- निलंगा येथे शेर-ए-हिंद शहीद टिपूसुल्तान संघटनेच्यावतीने दिल्ली येथील दंगलीस व संपूर्ण देशातील वातावरण गढूळ करणाऱ्या व भडकाऊ भाषणे करून तणाव निर्माण करणाऱ्या दोषींवर “३०२”प्रमाणे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागन्यासह इतर मागण्यांसाठी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
या निवेदनात दिल्ली येथील दंगल थांबवण्यास असमर्थ ठरलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ त्या संविधानिक गृहमंत्री पदाचा तात्काळ राजनामा द्यावा. तसेच दिल्ली येथील निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.दिल्ली मध्ये दंगलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असतांना देखील त्यात प्रामुख्याने काही दिल्ली पोलिसांनी दंगलखोलरांना आवर्जून मदत करत असल्याचे स्पष्ट व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे.परंतु अद्यापही कसलीच कारवाई करण्यात आली नसून त्या दंगलीत काही पोलिसांनी जे दंगलखोरांना मदत केली त्यांची शाहनिशा करून त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृह मंत्री अमित शहा यांनी जे आज देशात केंद्र सरकारने लादलेला एन.आर.सी.,सी.ए.ए.,व एन. पी.आर,कायद्या मुळे देशात अराजक्ता माजली असून सर्व देशवासि या कायद्यामुळे भयभीत झाले असून त्वरित देशहितासाठी देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी”सदरील कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा यासह अदी मागण्यांचे निवेदन शेर-ए-हिंद शहीद टिपूसुल्तान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुजीब सौदागर,तालुका अध्यक्ष सबदर काद्री,संभाजी ब्रिगेड चे शहर अध्यक्ष प्रमोद कदम, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, जमात-ए-ईस्लामी चे शहर अध्यक्ष साजिद आजाद, लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, एन. जी. ग्रुप चे निलेश गायकवाड, कांग्रेस पक्षाचे नेते दयानंद चोपणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष इस्माईल लदाफ, कांग्रेस अल्पसंख्याक कमिटीचे विधानसभा अध्यक्ष अजगर अन्सारी,गणराज्य संघटनेचे नेते रामलिंग पटसाळगे, स्वाभिमानी चर्मकार महासंघ संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार सोमवंशी,भारिप बहुजन युवक जिल्हा उपाध्यक्ष संदीप बनसोडे,नईम खतीब, साबेर चाऊस, तुराब बागवान, मुश्ताक बागवान,मुजम्ममील काद्री,बाबा बिबराळे,एम आय एम चे प्रवक्ते महेबूब मुल्ला,फिरोज जहागीरदार,अली मणियार, आदिसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते अनेक पक्षांनी व विविध सामाजिक संघटनांनी पाठींब्याचे पत्र देऊन धरणे आंदोलनास जाहीर पाठींबा दिला.दिल्ली येथील दंगलीत निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
*धरणे आंदोलनास जाहीर पाठींबा!*
संभाजी ब्रिगेड,रिपब्लिकन पार्टी आठवले गट,गणराज्य संघटना,जमात-ए-ईस्लामी,एमआयएम,चर्मकार महासंघ,भारीप बहुजन,लहुजी शक्ती सेना,कांग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,बहुजन क्रांती मोर्चा यांनी शेर-ए-हिंद शहीद टिपूसुल्तान संघटनेच्या धरणे आंदोलनास पाठींबा दिला…..






