Mumbai

? Big Breaking..प्रताप सरनाईकाच्या अडचणीत भर,ED ला सापडले पाकिस्तानी क्रेडिट कार्ड?

प्रताप सरनाईकाच्या अडचणीत भर, ED ला सापडले पाकिस्तानी क्रेडिट कार्ड?

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू आहे. पण आता प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate (ED) ने टाकलेल्या धाडीमध्ये सरनाईक यांच्या पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.

प्रताप सरनाईक यांची दोन दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. CNN NEWS18 ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने जेव्हा छापा टाकला होता. त्यावेळी एक पाकिस्तानी क्रेडिट कार्ड आढळून आले होते. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे.

पण, हे कार्ड सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे.
हे कार्ड फेयरमॉन्ट बँक, कॅलिफोर्निया इथून देण्यात आले आहे. ईडीने या क्रेडिट कार्डबद्दलची माहिती आणि स्टेटमेंटची मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. तसंच ईडीने फेयरमॉन्ट बँकेकडेही याबद्दल माहिती मागितली आहे.
24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या विशेष ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापा टाकला होता. दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलगा विहंग याला चौकशीला बोलावले होते. पण, परदेशातून आल्यामुळे सरनाईक कुटुंबीय क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर सरनाईक यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, 10 डिसेंबर रोजी प्रताप सरनाईक यांची ईडीने सलग 5 तास चौकशी केली होती. ‘आता पुन्हा EDच्या चौकशीला यावं लागणार नाही. जर काही प्रश्न असतील तर जेव्हा बोलावण्यात येईल त्यावेळी मी तात्काळ दोन तासात हजर होईल. तसंच माझ्या कुटुंबीयांमधील कुणालाही आता चौकशीला बोलवण्याची आवश्यकता नाही. खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्न-उत्तरे झाली. घोटाळा करणाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button