Chimur

स्व प्रमोद महास्व प्रमोद महाजन यांच्या कार्याचा वारसा चालविताना महिलांची उत्तम साथ-पूनम महाजन

स्व प्रमोद महास्व प्रमोद महाजन यांच्या कार्याचा वारसा चालविताना महिलांची उत्तम साथ-पूनम महाजन

चिमूर येथील हळदी कुंकू व महिला मेळावा

हजारोंच्या संख्येने महिलांची गर्दी

चिमूर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

स्व प्रमोद महाजन यांनी भाजपचा वटवृक्ष वाढवित असतांना याच चिमूर शहरात एका सभेत 5 कार्यकर्त्यापासून सुरू केलेला भाषण आज त्यांची मुलगी म्हणून 50 हजार कार्यकर्त्यापर्यत भाजपचे विचार वाढविण्याचे काम केल्याने हजारोंच्या संख्येने आलेल्या महिला भगिनी ही त्याच भाजपची ताकत आहे असे खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पूनम प्रमोद महाजन या बोलत होत्या त्या चिमूर येथे भव्य महिला मेळावा तथा हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होत्या.

चिमूर येथील हुतात्मा स्मारक सभागृहात भाजप महिला तालुका आघाडीच्या वतीने आयोजित भव्य महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी उदघाटक भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार पूनम महाजन होत्या .
यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया ,जीप उपाध्यक्ष रेखा कारेकर, भाजप महिला आघाडी प्रदेश महामंत्री माजी महापौर अर्चना डेहनकर ,वसंत वारजूकर ,भाजप महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष रेणुका दुधे ,सामाजिक कार्यकर्त्या मेघा भांगडीया ,अपर्णा भांगडीया, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शिल्पा राचलवार ,नप गट नेत्या छाया कनचलवार ,डॉ देवनाथ गणधारे , दत्तू पिसे, डॉ श्यामजी हटवादे, प्रकाश वाकडे, निलम राचलवार, राजू देवतळे ,मजहर पटेल ,प्रा विजय टिपले ,मनोहर मुंगले, ओमप्रकाश गणोरकर, दिलीप कारेकर, अवि बारोकर, नम्रता राचलवार ,किशोर मुंगले उपस्थित होते .

याप्रसंगी बोलतांना पूनम महाजन म्हणाल्या की महिलांच्या आरोग्यासाठी चूल मुक्त करण्याचे धोरण व स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ भारत करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले .महिला कश्या सक्षम राहील यावर बोलत विकासाची लक्ष्मी ही कमळावर बसूनच येत असलयाचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करीत विविध योजना दिल्या त्यामुळे महिलांना सन्मान मिळाल्याचे त्या म्हणाल्या.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की आम्ही राजकारण करीत असताना मातृशक्तीचे प्रेम हीच भाजपची शक्ती असून मतदार संघातील मातृशक्ती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप वर प्रेम करीत असताना त्यांनी दोन वेळा भाजपचा उमेदवार विजयी झाल्याने मातृशक्ती सिद्ध झाले जेव्हा पासून देश स्वंतत्र झाला तेव्हा पासून चिमूर क्रांती भूमीला न्याय दिला नाही सन 2014 पासून केंद्र व राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने न्याय देण्याचे काम करून भरपूर निधी देत चौफेर विकास केला सत्ता कोणाचीही असो हक्क व न्यायासाठी आपल्या सहकार्याने खंबीर राहत असल्याचे गर्जून सांगितले शिवसेने स्वतःची पोळी शिकण्यासाठी विरोधी विचारसरणी सोबत हातमिळवणी केला असल्याचा आरोप सुद्धा केला क्रांती भूमीत दोन वेळा आमदार होण्याचा मान मातृशक्ती मुळे झाला असल्याचे सुद्धा सांगितले बंटी भांगडीया यांनी सांगितले व या मातृशक्ती चे आभार मानले .

यावेळी पूनम महाजन व आमदार बंटी भांगडीया यांचा सहपत्नी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान डॉ श्यामजी हटवादे,गीता लिंगायत,प्रदेश महामंत्री अर्चना डेहनकर, अपर्णा भांगडीया, निलम राचलवार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले .
दरम्यान खासदार पूनम महाजन यांचे जोरदार स्वागत केले महिलांना होम मिनिस्टर च्या धर्तीवर रोशन अगडे व त्यांच्या संचनी उर्वरित वेळेत रिजविले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया ननावरे यांनी केले संचालन भारती गोडे तर आभार कल्याणी सातपुते यांनी केले भाजप महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या मेळाव्यास हजारो महिलांची उपस्थिती होती .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button