Chandwad

चांदवडला ओबीसींचा मोर्चा

चांदवडला ओबीसींचा मोर्चा

उदय वायकोळे चांदवड

Chandwad : चांदवड येथील ओबीसी संघटनांनी काल दि 1 डिसेंबर2020 रोजी ओबीसी आरक्षण टिकून राहावे व ओबीसी जागा हो परिवर्तनाचा धागा हो,अश्या घोषणा देत चांदवडचे तहसीलदार श्री प्रदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे.मराठा व ओबीसी समाजातील एकोपा दूर जाऊन वैर निर्माण व्हावे अश्या दुष्ट हेतूने बाळासाहेब सराटे काम करीत आहे.फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात काही विरोधी शक्ती कार्यरत आहेत त्यांना आळा घालण्यात यावा.
या निवेदनावर अशोककाका व्यवहारे,निवृत्ती व्यवहारे,अल्ताफ तांबोळी,यु के आहेर,सयाजीराव गायकवाड,रघुनाथ आहेर यांच्या सह्या आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button