खिर्डी खु येथील बलवाडी रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्यात यावा फलक अखेर लावण्यात आला.
खिर्डी प्रतिनिधी – भिमराव कोचुरे
बलवाडी रोड वर घाणीचे साम्राज्य व नागरिकांचे आरोग्य धोक्यात या बातमी ची त्वरित दखल घेत .ग्राम पंचायत प्रशासनाने साफ सफाई नियमित पणे साफ सफाई चे काम सुरू केलेले आहे. आज ग्राम विकास अधिकारी श्री.गोकुळ सोनवणे यांनी स्वतः उपस्थित राहून त्या ठिकाणी फलक लावण्यात आला या पुढे गावातील पशुपालकानी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.सदरील ठिकाणी कोणी कचरा टाकताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल व दंड वसूल केला जाईल गावातील पशुपालकानी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सदर ठिकाणी ग्राम पंचायत कर्मचारी व सफाई कर्मचारी यांनी परिश्रम घेत काम पूर्ण केले. व गावात दवंडी देवून पशुपालकांना समज दिला जाईल . ग्रा.पं लिपिक योगेश कोळंबे, राजू कोचुरे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तसेच ठोस प्रहार चे प्रतिनिधी यांनी वारंवार पाठ पुरावा करून अखेर फलक लावण्यात आला.