Amalner

Amalner: जीवनावश्यक वस्तूंवरील जिएसटी हटवा..व्यापारी संघटनांची मागणी..

Amalner: जीवनावश्यक वस्तूंवरील जिएसटी हटवा..व्यापारी संघटनांची मागणी..

अमळनेर(प्रतिनिधी) :- अन्नधान्यासह काही जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात आज अमळनेर येथील व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य तसेच शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे असे दि ग्रेन अँड किराणा मर्चंट असोसिएशन, अमळनेर यांनी उपविभागीय अधिकारी अंमळनेर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.सदर निवेदन नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना देण्यात आले.
18 जुलैपासून पॅकिंग केलेल्या अनब्रँन्डेड अन्नधान्यासह काही वस्तूंवर जीएसटी लागू होणार आहे. त्याविरोधात आज व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे महत्त्वाच्या बाजारपेठांवर आज परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. 8 ते 10 टक्के दरवाढीचा बोजा ग्राहकांवरच पडणार आहे.

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह किराणा मालावर लावलेल्या जी एस टी विरोधात जळगाव मध्ये आज व्यापाऱ्यांनी राज्य व्यापी बंद पुकारला असून या मध्ये जळगाव जिल्ह्यातील पन्नास हजार व्यापाऱ्यांनी ही कडकडीत बंद पुकारला आहे. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह किराणा मालावर पाच टक्के जी एस टी लावल्याने व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक यांना त्याचा फटका बसणार असून महागाई वाढणार असल्याने हा जीएसटी कर सरकारने रद्द करावा अशी मागणी व्यापारी असोसिएशनने केली आहे. केंद्र सरकारचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांनी आजचा एक दिवसीय बंद पुकारला आहे. या मध्ये जळगाव जिल्ह्यातील पन्नास हजार व्यापारी सहभागी झाले असून आजच्या या बंदमुळे दोनशे ते तीनशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटल आहे

निवेदन देते प्रसंगी दि ग्रेन अँड किराणा मर्चंट असोसिएशनचे तालुका अध्यक्ष बिपीन कोठारी,झामनदास सैनानी,मोतीराम (बापू)हिंदूजा,राजेन्द्र बहादरमल जैन, अनिल वाणी इत्यादी व्यापारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button