Amalner: प्रौढ व्यक्तीचा मृतदेह आढळला दुसऱ्या गावात...
अमळनेर आज दुपारी सबगव्हाण शिवारात एका ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकाश नवल पाटील शेतात गेले असता त्यांना त्यांचे काका नाना रामदास पाटील वय 55 वर्षे रा झाडी मृत अवस्थेत आढळून आले. मृतदेह कुत्रे किंवा अन्य प्राण्याने लचके तोडल्यामुळे विखुरलेल्या अवस्थेत होता.
व त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.प्रकाश पाटील यांनी मारवड येथे दिलेल्या तक्रारी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करून कोणावरही संशय नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास हवालदार सचिन निकम करत आहे.






