Amalner

?️अमळनेर कट्टा..तलाठी बांधवावर जिवावर बेतलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लेखणी बंद आंदोलन

?️अमळनेर कट्टा..तलाठी बांधवावर जिवावर बेतलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लेखणी बंद आंदोलन
तलाठी संघटनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
अमळनेर येथे वाळू माफियांनी तलाठ्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमळनेर तालुका तलाठी संघ निवेदन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दिनांक 22/05/2021 रोजी शनिवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास गंगापुरी गावाजवळ असलेल्या तापी नदी पात्रात अवैध गौणखनिज वाहतुकीस आळा घालण्याकामी म.उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर आणि म.तहसीलदार सो अमळनेर यांच्या सह पथक गेले असता पथकातील सदस्य तथा शहर तलाठी गणेश राजाराम महाजन यांचेसह पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे सदर घटनेचा अमळनेर तालुका तलाठी संघ जाहीर निषेध केला आहे. त्याबाबत दि.22/05/2021 रोजीच सदर घटनेची फिर्याद अमळनेर पो.स्टे.येथे देण्यात आली असुन अद्यापपर्यंत गुन्हा दाखल होऊन 2 दिवस उलटून सुद्धा आरोपींना अटक झालेली नाही म्हणुन दि.24/5/2021 पासुन आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत कोविड विषयक आणि नैसर्गिक आपत्ती वगळता लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात येत आहे.
निवेदन देण्यासाठी अमळनेर तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष जी .आर. महाजन ,कार्याध्यक्ष एस ए कुलकर्णी, चिटणीस मुकेश देसले, जिल्हा उपाध्यक्ष वाय .व्ही. पवार, उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, सहचिटणीस पी.पी चव्हाण, संघटक व्ही. पी पाटील ,ऑडिटर वाय. आर. पाटील व संघटनेचे सदस्य उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button