Pandharpur

Pandhrpur: फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये पत्रकार दिन साजरा

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये पत्रकार दिन साजरा

प्रतिनिधी
रफिक आतार

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली. सहा जानेवारी रोजी दर्पण वृत्तपत्र चा पहिला अंक प्रकाशित झाला तोच दिवस जांभेकर यांचा जन्म दिवस असल्यामुळे दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. प्रथम पासून दर्पण वर बाळ शास्त्रींच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. अशा या युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेत पत्रकार दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पत्रकारिता म्हणजे काय तसेच या क्षेत्राबद्दल माहिती मिळावी म्हणून प्रमुख पाहुणे पत्रकार श्री दत्तात्रय वसंत खंडागळे व श्री संजय गुलाबराव बाबर हे लाभले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते युगप्रवर्तक जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाळेचे प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाहुण्यांच्या मनोगतात पत्रकार दत्तात्रय खंडागळे यांनी पूर्वीच्या पत्रकारितेचे वर्णन केले व चांगल्या वर्तनाची लक्षणे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच श्री संजय बाबर यांनी पत्रकारिता म्हणजे समाज मनाचा आरसा असून समाज हित व समाज सुधारणा करणारे एक क्षेत्र आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील कुमारी सुप्रिया पवार व रिया कुमठेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे व प्राचार्य व प्राचार्य सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button