पालिकेच्या सर्वसाधारण सभेत खासदार उन्मेष पाटील यांचा अभिनंदनाचा ठराव
चाळीसगाव प्रतिनिधी-नितीन माळे
येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपाध्यक्षा आशाबाई चव्हाण,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या उपस्थितीत आज सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आली होती. सभेला सत्ताधारी गटाचे नेते संजय पाटील, विरोधी गटाचे नेते माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, आण्णा कोळी, रामचंद्र जाधव , आनंद खरात, यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला स्व.उद्योजक हिमाभाई हिरूभाई पटेल यांच्यासह दिवंगत शहरवासियांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर युवा नगरसेवक नितीन पाटील यांनी विक्रमी मतांनी विजयी झालेले चाळीसगांव नगरीचे भूमिपुत्र उन्मेष दादा पाटील यांचे अभिनंदनाचा ठराव मांडला ते म्हणाले की आमचे नेते चाळीसगाव विधानसभेचे तत्कालीन आमदार यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात दुसऱ्या क्रमांकाची चार लाख अकरा हजार मतांपेक्षा अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवलाआहे. शहराचे भूमिपुत्र असलेले प्रचंड मेहनती, अभ्यासू वृत्ती आणि सतत मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास असलेले नवनिर्वाचित खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मी मांडत आहे. माझी सभागृहाला विनंती राहीन की आपण सर्वांनी बाके वाजवून याचे समर्थन करावे. मित्रहो… खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज या पालिकेचा कारभार पाहत आहोत अध्यक्षा, उपाध्यक्षा व सभापती तसेच सहकारी नगरसेवक आम्हाला सदैव उन्मेष दादांचे मार्गदर्शन राहिले आहे. अतिशय खडतर प्रवास करीत आमदारकी आणि खासदार पदी त्यांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. उन्मेष दादांच्या यशस्वी नेतृत्वाखाली पालिकेने तीन महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या सिग्नल चौकात उभाराव्याच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी, वाढत्या शहराला चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा करता यावा यासाठी सुमारे सत्तर कोटींची समांतर पाणी पुरवठा योजना तसेच एकशे पंचवीस कोटी रुपये खर्चाची भुयारी गटार योजना या तिन्ही योजनांचे काम प्रगती पथावर आहे. या तिन्ही योजनांचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यात व लौकिकात भर पडणार आहे. मला व्यक्तिशः आनंद आहे की आमचे नेते खासदार उन्मेष दादा पाटील यांनी मतदान झाल्यानंतर कुठलाही आराम अथवा सहलीवर न जाता लागलीच भुयारी गटार योजने साठी पासष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून घेतला आहे. मला अभिमान आहे. अशा धडाडीच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने साडे चार वर्षे विधानसभा गाजविली आता येत्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला लोकसभा मतदार संघ देशातील विकासाकडे झेप घेणारा आदर्श मतदार संघ झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा खासदार उन्मेष दादा पाटील यांचा अभिनंदनचा ठराव मांडत असून तालुक्याचे कर्तव्य सम्राट खासदार उन्मेष दादा पाटील यांचे पुनश्च अभिनंदन करतो..
खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या दिमाखदार विजयाचे पालिका अभिनंदन करीत असल्याचा हा एक ओळींचा ठरावास सर्वांनी संमती द्यावी अशा सभागृहाला विनंती करतो. असे ते म्हणाले यावर सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. सत्ताधारी पक्षाचे नेते संजय पाटील यांनी ठरावाला अनुमोदन दिले.







