Pandharpur

भीमशक्ती मंडळाच्या वतीने रमजान ईद निमित्त अत्यावश्यक साहित्य वाटप

भीमशक्ती मंडळाच्या वतीने रमजान ईद निमित्त अत्यावश्यक साहित्य वाटप
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : कोरोना महामारीच्या संकटात भीमशक्ती सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व उमेश सर्वगोड मित्र परिवार संतपेठ पंढरपुर यांच्यावतीने संतपेठ महापूर चाळ,बडवे चर झोपडपट्टी याठिकाणी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारी च्या संकटकाळात मदतीचा हात म्हणून या आवश्यक साहित्यांचे वाटप भीमशक्ती सांस्कृतिक मंडळाचे आधारस्तंभ मा.संतोषजी सर्वगोड व युवक नेते मा.निलेश जाधव यांच्या वतीने करण्यात आले.याप्रसंगी आयोजक युवकनेते मा.उमेश सर्वगोड,नवनाथ गायकवाड,लखन सर्वगोड,प्रशांत सर्वगोड,सुमित माने,आदित्य गावकरे आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button