Maharashtra

रात्रीच्या वेळी पंढरपूर शहराचा नदीकाठ बनतोय वाळू माफियांचा बिजनेस

रात्रीच्या वेळी पंढरपूर शहराचा नदीकाठ बनतोय वाळू माफियांचा बिजनेस
प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर: कोरोनाच्या भीतीने एकिकडे संपूर्ण जग जीवाच्या भीतीने भेदरून गेले आहे प्रत्येक देश आपापल्यापरीने या विषणू पासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न आहे यासाठी रोज नवनवीन उपाययोजना व कडक पावले उचलली जात आहे महाराष्ट्र राज्यात व सोलापूर जिल्ह्यात या विषाणूचा प्रदृर्भाव रोखण्यासाठी एकीकडे लोकांना घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले असतानाही दुसरीकडे भीमा नदीवरील वाळू चोरांनी मात्र या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे पंढरपूर तालुक्यातील व शहरातील अनिल नगर झोपडपट्टी व्यास नारायण झोपडपट्टी कुंभार गल्ली बंधारा रेल्वे पुलाखालून रात्रीच्याला या भागातून भीमा नदीतून पिकप व मोटरसायकली ऑटो रिक्षा एट हंड्रेड व गाढवा वरून रात्रीच्याला बारा वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत या भागातून वाळू वाहतूक केली जाते दिवसभर भीमा नदीच्या कडेला वाळू माफिया दारूच्या पार्टी व मटणावर ताव मारत वाळूचा साटपा करून घेत असतात व रात्र झाली का वाळू वाहतूक चालू केली जाते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकाला डिझेल पेट्रोल मिळणे मुश्किल असताना या वाळू माफियांना डिझेल व पेट्रोल कोठून मिळते हे नागरिकांमधून चर्चेचा विषय बनत आहे त्यामुळे या झोपडपट्टीतील राहणाऱ्या नागरिकांना या वाळू माफियांचा रात्रीच्या ला त्रास होत आहे उन्हाळ्यामुळे झोपडपट्टीतील काही नागरिक वयोवृद्ध लहान मुले बाहेर रोडवर झोपलेली असतात भविष्यात या वाळूमाफिया यामुळे या भागात अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या वाळू माफियांचा पोलीस व महसूल प्रशासन यांनी त्यांचा बंदोबस्त करावी अशी या या भागात राहणाऱ्या नागरिकांतून बोलले जात आहे कोरोनाच्या आजाराच्या पैलाव रोखण्यासाठी एकीकडे प्रशासन गुंतलेले असताना काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अगदी दिवसाढवळ्या हा वाळूउपसा बिनधास्तपणे सुरू असतो मात्र या साऱ्या घडामोडीत अक्कलकोट तालुक्यात जसा “पिंट” नावाचा एक अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला तरुण पुढे दोन तालुक्यातच्या सेंड लॉबीचा हेड झाला होता गोळी बारापर्यंत त्याची मजल गेली होती तसेच छोटे छोटे “पिंटू” पंढरपूर शहरात निर्माण होण्यापासून रोखण्याची जबाबदारी पोलीस आणि महसूल प्रशासनाची आहे. भाजीपाला दूध दवाखाने व इतर अत्यावश्यक सेवेकरिता ग्रामीण भागात ग्रामीण जनजागृती समितीच्या वतीने पास देण्यात आले शहरातील अनेकांना पास देण्यात आले आहे पास मध्ये मोठी राजकारण शिरल्याने ग्रामीण सह शहरी भागात पाच धारकांची संख्या मोठ्यांनी वाढली आहे या पासचा गैरफायदा घेतला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे कारण पास दाखवून काही नागरिक व टवाळखोर मंडळी विनाकारण भटकत असल्याचे पाहावयास मिळत आहे काही पास धारकांनी तर आपला पासचा गैरफायदा घेत पेट्रोल विक्री चा अनोखा धंदा सुरू केल्याचे सांगितले जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button