उमरेड तालुक्यात इव्हीएम व्हीव्हीपॅट’बाबत आता गावोगावी जनजागृती मोहीम
चांपा प्रतिनिधी अनिल पवार
चांपा येथे आज ग्रामपंचायत कार्यालयात इव्हीएम व्हीव्हीपॅट’बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली .
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येणार्या मागणीनुसार व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल) यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. मतदाराने कोणत्या पक्षाला तसेच उमेदवाराला मत दिले आहे हे त्यांना पावती स्वरुपात समजणार आहे. उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अतिश पवार यांच्या उपस्थितीत नागरिकांना इव्हीएम व्हीव्हीपॅट’बाबत पथक प्रमुख एम .जी .माने यांनी मार्गदर्शन केले .यावेळी सहायक पथक प्रमुख राकेश पोटवार , एन .आर .तिनखेडे तलाठी प्रियंका अलोने यांच्या उपस्थितीत चांपा ग्रामपंचायत कार्यालयात इव्हीएम व्हीव्हीपॅट’बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली .
८२मतदार केंद्रात ‘ इव्हीएम व्हीव्हीपट’संदर्भात जनजागृती मोहीम पथकाने २६ऑगस्ट ते २०सप्टेंबर पर्यंत उमरेड तालुक्यातील प्रत्येक गावागावांत जाऊन मशीनचे प्रात्याक्षिक दाखवण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमरेड तालुका निवडणूक शाखेने तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत आधी बॅलेट युनिट मतपत्रिका आणि कंट्रोल युनिट आणले गेले होते.
महिनाभर राबवणार मोहीम
व्हीव्हीपॅट मशीनबाबत नागरिकांमध्ये अफवा पसरवल्या जात आहेत. या शंकांचे निराकरण करण्यासाठी आता २६ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान उमरेड तालुक्यातील सर्व मतदान केंद्रे, आठवडे बाजार तसेच गावोगावी पथकामार्फत प्रात्याक्षिक सादर करून नागरिकांच्या शंकांचे निराकरण करण्यात येणार आहे. याकरिता विशेष पथकही नियुक्त करण्यात आल्याचे उमरेडचे उपविभागीय अधिकारी जे .पी लोंढे यांनी सांगितले .
सहकार्य करावे
निवडणूक यंत्रणेविषयी राजकीय पक्षांकडून नेहमीच आरोप-प्रत्यारोप केले जातात. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांसाठी ही तपासणी मोहीम खुली ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या तपासणीदरम्यान उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
– तहसिलदार प्रमोद कदम यांनी सांगितले.







