ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी नाशिक जिल्यात दिंडोरीत तहसीलदारांकडेदिले निवेदन
सुनिल घुमरे नाशिक
Nashik : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील तहसीलदारांना आज ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारचे वतीने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे तसेच ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासह विविध मागन्यांनचे निवेदन दिंडोरी येथील नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी पाटील यांना काँगेस चे तालुका अद्यक्ष सुनिल आव्हाड, राष्ट्रवादी काँगेस चे अद्यक्ष भास्कर भगरे, समता परिषद चे जिल्हा अद्यक्ष संतोष डोमे ,डॉ सेलचे जिल्हा अद्यक्ष डॉ योगेश गोसावी, सुतार लोहार संघटनेचे जिल्हा अद्यक्ष दिलीप पेंढारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले
दिंडोरी नगरपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चा ची सुरवात झाली.कोरोनाच्या पाश्वभूमीवर शांततेत तहसील कार्यालयात येऊन निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हंटले आहे
राज्यात जरी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी तीन उपगट असले व हीजेएनटीचे आणखी चार उपगट आहे त तरी ह्या सर्व जातीजमाती केंद्रीय यादीत ओबीसी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या तसेच पंचायत राज्यातील राजकीय आरक्षणासाठी त्या सर्वाना ओबीसी म्हणुनच मान्यताही आहे.आणि ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाला केवळ २७ टक्के तेही पूर्ण नाही त्यात पुन्हा कुणबी समाज येत असल्याने आरक्षण पूर्ण मिळत नाही.२७ टक्के आहे तेच कमी असतांना त्यात कमी केले तर अन्याय होईल व अन्याय ओबीसी समाज सहन करणार नाही.यासाठी ओबीसी समाजाची जनगणना करावी. अशी एकमुखी मागमी आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे.
यावेळी ओबीसी समाजाचे सोमनाथ सोनवणे, शिवसेनेचे माजी तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ ढाकणे, बाळासाहेब चकोर, राजाभाऊ गोसावी, जगदीश सोनवणे, जय भगवान सेनेचे गोविंद ढाकणे, हर्षल काठे, राजेंद्र सोनवणे, प्रवीण लाहितकर, सोनू काठे, तौशिफ मणियार, दुर्गेश चित्तोडे, अनिल गोवर्धने, शांताराम पगार, बापू चव्हाण, संदीप गुंजाळ, अमोल जाधव, निलेश मौले,आदीसह समाज बांधव उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
फोटो- ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठीचे निवेदन नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी पाटील यांना देतांना काँगेस चे तालुका अद्यक्ष सुनिल आव्हाड, राष्ट्रवादी काँगेस चे अद्यक्ष भास्कर भगरे, समता परिषद चे जिल्हा अद्यक्ष संतोष डोमे ,डॉ सेलचे जिल्हा अद्यक्ष डॉ योगेश गोसावी, आदी






