मराठी पत्रकार संघाच्या दिंडोरी तालुक्यातील सदस्यांना आर्सेनिक अल्बम औषध वाटप
सुनील घुमरे
देशात कोरोना विषाणूचा प्रमाण वाढ होत कारणाने दिंडोरी नगर परिषदेचे गटनेते व नगरसेवक यांच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांना आर्सेनिक अल्बम ३० हे औषध मोफत वाटप करण्यात आले .
प्रसंगी दिंडोरी नगरपंचायतीचे दिंडोरी शहर विकास आघाडीचे गटनेते प्रमोद शिवाजीराव देशमुख , भाजपा जेष्ठ नेते चंद्रकांत राजे ,नगरसेवक तुषार भाऊ वाघमारे ,भाजपा तालुका अद्यक्ष नरेंद्र जाधव ,निलेश गायकवाड , काका देशमुख , दत्तात्रय जाधव , साजन पगारे , रविशेठ जाधव , भास्करराव कराटे , शाम मुरकुटे , विक्रम राजे , सुहास देशमुख , दिपक देशमुख यांच्या उपस्थित तालुक्यातील पत्रकारांना आर्सेनिक अल्बम ३० औषध मोफत देण्यात आले .
यावेळी मेकवेल इंडस्ट्रिज सिन्नर यांचे संचालय संजय शहा होमी ओपॅथीकचे डॉ अनूप गवांदे तसेच नगरसेवक तुषार वाघमारे यांच्या पुढाकाराने उपक्रम आयोजन केले होते दिंडोरी शहर तालुक्यातील मोठ्या गावांना वितरीत करण्यात येत असल्याचे तुषार वाघमारे यांनी बोलतांना म्हणाले आगामी काळात एक महीण्यानंतरचे बूस्टर डोस कंपनीमार्फत वितरण करणार असल्याचे प्रमोद देशमुख यांनी दिली . प्रसंगी संयोजकांचे दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने संतोष कथार यांनी आभार मानले.
यावेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कल्याणराव आवटे दिंडोरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार, सरचिटणीस भगवान गायकवाड ,उपाध्यक्ष सुखदेव खुर्दळ, केशव चिते,संजय थेटे, गोरख जोपळे, बंडा महाराज खडांगळे , विलास जमदाडे, किशोर जाधव , बापू चव्हाण, शामराव सोनवणे , बाळासाहेब अस्वले ,शांताराम पगार, राजेंद्र जाधव,दशरथ पगारे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.






