Pandharpur

पंढरपूर तालुक्यातील खर्डी गाव शंभर टक्के कोरोना मुक्त: युवा नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते कोविड सेंटरचा सांगता समारंभ

पंढरपूर तालुक्यातील खर्डी गाव शंभर टक्के कोरोना मुक्त: युवा नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते कोविड सेंटरचा सांगता समारंभ

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : जागतिक महामारी कोरोना या भयंकर रोगामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. गेले दीड वर्षापासून सर्वत्र जनजीवन विस्कळीत जनसामान्यांचे जगणे मुश्किल झाले होते. पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर असल्यामुळे याठिकाणी ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे.त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील रोड लगतच्या गावांना तसेच शहर व ग्रामीण भागात कोरोनाने थैमान माजवले होते, दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्या वाढल्यामुळे पंढरपूर शहरामध्ये कोविड सेंटर व हॉस्पिटल अपुरी पडू लागल्यामुळे शासनाने तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कोविड सेंटर सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने खर्डी ग्रामपंचायत यांच्या वतीने व गावातील तरुणांच्या सहकार्याने खर्डी येथे श्री सिताराम महाराज विद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने दिनांक 2/5/ 2021 रोजी कै. सुधाकरपंत परिचारक कोविड सेंटर सुरू केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यासाठी खर्डी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तसेच खाजगी डॉक्टर यांच्या संगनमताने रूग्णांना योग्य ते उपचार देण्यात आले. योग्य उपचार मिळाल्यामुळे दोनशेहून अधिक कोरोना रुग्ण बरे होऊन सुखरूप आपल्या घरी पोहोचले.
ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शिक्षक, श्री सिताराम महाराज विद्यालयाचे शिक्षक स्टाफ यांच्या वतीने रूग्णांना सकस आहार यामध्ये चहा, नाश्ता जेवण तसेच सॅनिटायझर, मास्क इत्यादी सोय करण्यात आली होती. याकामी आशावर्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले कोरणा चा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत गेल्याने खर्डी तसेच आसपासची गावे शंभर टक्के कोरोना मुक्त झाल्याने 20/6/2021 रोजी कै. सुधाकर परिचारक कोविड सेंटरची सांगता करण्यात आली. यावेळी पंढरपूर तालुक्याचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते कोरोना काळात ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मोलाचे सहकार्य व योगदान केल्याबद्दल सत्कार करण्यात आले.यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, खर्डी ग्रामपंचायत सरपंच सौ. मनीषा भगवान सव्वाशे, उपसरपंच शरद रोंगे, माजी सरपंच रमेश हाके, ग्रामपंचायत सदस्य नारायण रोंगे, उत्तम रोंगे, दाजी चंदनशिवे, मिनाज पठाण, विष्णू सुळे, सिताराम रोंगे, डॉक्टर अमित चंदनशिवे, डॉक्टर सूर्यकांत पाटील, डॉक्टर साळुंखे, डॉक्टर पडळकर, भगवान सव्वाशे, समाधान कावरे, जिल्हा परिषद शिक्षक नीलकंठ गोरे, खांडेकर, परिचारक,श्री. सिताराम महाराज विद्यालय मुख्याध्यापक श्री कुलकर्णी, तसेच शिक्षक भारत पाटील, श्री गायकवाड, आनंदा रोंगे, चंद्रकांत रोंगे, पोलीस पाटील रोंगे, ग्रामसेवक सचिन माने, लिपिक बंडूलाल पठाण, शिपाई प्रभू गायकवाड. आशावर्कर सुनीता शिंदे, अर्चना चंदनशिवे, सोजर चंदनशिवे ,रेश्मा चंदनशिवे, मनीषा कोळी, मनीषा चव्हाण, शमा पठाण, हसीना तांबोळी, कुलकर्णी, पत्रकार संतोष कांबळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button