Bollywood

बिग बी सोशल मिडिया वर ट्रोल..पहा काय म्हणाले नेटकरी..

बिग बी सोशल मिडिया वर ट्रोल..पहा काय म्हणाले नेटकरी..

मुंबई अमिताभ बच्चन आजही सर्वच ठिकाणी वयाच्या ७८ व्या वयात देखील अभिनयात सक्रिय तर आहेतच. सोशल मीडियावर देखील तितकेच आहेत. बिग बींचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. अमिताभ बच्चन वेगवेगळ्या मुद्यांवर कायम ट्वीट करतात आणि चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी १७ जुलैला एक ट्वीट केलंय. यात ते म्हणाले, “लिहायला काही नाही”. बिग बींच्या या ट्वीटवर त्यांना सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलंय. अनेकांनी त्यांना जर लिहायला काही नसेल तर त्यांनी काय लिहावं हे सुचवंल आहे. एक नेटकरी म्हणाला, “मग पेट्रेलबद्दल लिहा.”

अमिताभ बच्चन यांनी २०१२ सालात पेट्रोलच्या दरवाढीवरू एक मजेशीर पोस्ट शेअर केली होती. या जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि त्यांच्या वर टिका देखील केली आहे. तर एक जण म्हणाला, “हो नक्कीच लिहिण्यासाठी आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर यावेळी पेट्रोलवर काही बेधडक लिहून दाखवा.”
आणखी एक नेटकरी म्हणाला, “२०१३ सालात मोदीजींनी जितके पैसे तुम्हाला पेट्रोलवर ट्वीट करण्यासाठी दिले होते. त्याहून दुप्पट आम्ही सर्व भारतीय तुम्हाला देऊ. रोज फक्त पेट्रोलचा दर ट्वीट करा.”दरम्यान कामाबद्दल सांगायचं झालं तरबिग बी लवकरच ‘चेहेरे’ या सिनेमात झळकणार आहेत. हा सिनेमा तयार असून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. याशिवाय नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ या सिनेमातही ते झळकणार आहेत. तसचं ब्रह्मास्त्र, मेडे और गुडबाय या सिनेमाच्या प्रोजेक्टवर ते काम करत आहेत.बिग बी सोशल मिडिया वर ट्रोल..पहा काय म्हणाले नेटकरी..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button