Rawer

ऐनपूर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासाचे नियोजन या विषयावर वेबिनार संपन्न.

ऐनपूर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासाचे नियोजन या विषयावर वेबिनार संपन्न.

निंभोरा बुद्रुक ता.रावेर संदीप कोळी

ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि गुरुकुल ऑनलाइन अकॅडमी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासाचे नियोजन या विषयावर वेबिनार चे आयोजन करण्यात आले. सदर वेबिनार मध्ये एकूण 94 विद्यार्थ्यांनि सहभाग नोंदवला.

सदर वेबिनार चे अध्यक्ष स्थान प्राचार्य, डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. लक्ष्मण चौधरी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा ना सामोरे जाण्यासाठी वेळेचे नियोजन कसे करावे तसेच पूर्व परीक्षेची तयारी करत असताना कोणकोणते विषय अभ्यासावे याबद्दल विस्तृत चर्चा केली. प्रा.लक्ष्मण चौधरी यांनी शासनाच्या विविध भरती प्रकिया बद्दल माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंका चे निरसन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थी हा आजच्या या स्पर्धेच्या युगात मागे राहायला नको यासाठी सादर वेबिनार चे आयोजन करण्यात आले याचा नक्कीच आपल्या ला फायदा होईल असे मत मांडले. कार्यक्रम माचे प्रास्तविक, सूत्रसंचालन आणि आभार डॉ. सतीश वैष्णव यांनी मानले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शना खाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकानीं वेबिनार च्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button