Pandharpur

व्हॅलेन्टाइन डे म्हणून न साजरा करता मातृ पितृ दिन साजरा करण्यात आला

व्हॅलेन्टाइन डे म्हणून न साजरा करता मातृ पितृ दिन साजरा करण्यात आला

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर शहरांमध्ये 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेन्टाइन डे म्हणून न साजरा करता मातृ पितृ दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यासाठी काल सायंकाळी साडेसात वाजता मराठा सेवा संघ,शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि राजहंस बहुउद्देशीय सामाजिक संघटना, यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या बि. बि.दारफळ गावातील निराधार मातापित्यांना, अनाथ लोकांना, अन्नधान्य, खाऊ,व पुष्पगुच्छ देऊन त्यांना आधार देण्यात आला.

व्हॅलेन्टाइन डे म्हणून न साजरा करता मातृ पितृ दिन साजरा करण्यात आलायावेळी जि. प. प्रा.शाळेतील मुलांनी मातापित्यांविषयी महत्व देणारे गीत गाऊन व सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमासाठी तिन्ही सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि गावातील माता भगिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कालच्या दिवशी काश्मीर मधील पुलवामा येथे भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारत मातेच्या सुपुत्राना आपल्या गावकर्यांच्या आणि सामाजिक संघटनेच्या वतीने जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button