Amalner

सबगव्हाण येथे गावठी दारूवर पोलिसांची धाड… मुद्देमाल केला जप्त विक्रेते मात्र सैराट.

सबगव्हाण येथे गावठी दारूवर पोलिसांची धाड… मुद्देमाल केला जप्त विक्रेते मात्र सैराट.

रजनीकांत पाटील

अमळनेर :- तालुक्यातील सबगव्हाण येथे गावठी दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी धाड टाकून मुद्देमाल जप्त केला. मात्र आरोपी फरार झाला आहे.

स.पो.नि. राहुल फुला यांना मिळालेल्या माहितीनुसार सबगव्हाण येथील न्यू प्लॉट भागात बापू सुकदेव भील हा गावठी दारू विकत होता. त्यामुळे पोलिस कर्मचारी यांनी जावून खात्री केली असता सदर व्यक्ती मुद्देमालासह दिसून आला. मात्र त्याला पोलिस कर्मचारी दिसल्याने तो मुद्देमाल टाकून गल्लीबोळातून पळून गेला. यावेळी १८००/- रुपये किमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. पो. कॉ. सचिन निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात मु.प्रो. ॲक्ट कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button