Amalner

Amalner: जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा अमळनेर ग्रामीण काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी…

Amalner:जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा अमळनेर ग्रामीण काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी

अमळनेर जिवनाश्यक वस्तूवरील जी.एस.टी. रद्द करण्यात यावी अशी मागणी अमळनेर ग्रामीण काँग्रेसतर्फे करण्यात आली असून यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे देशांमध्ये दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस च्या
वाढत्या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे.
जिवनाश्यक वस्तूंवरील लावलेल्या जी.एस.टी.मुळे सामान्य माणसाला जिवन जगणे मुश्कील झाले आहे. तसेच घाई घाईत चालू केलेल्या भारतीय सैन्य दलातील अग्निपथ योजनेमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सर्व विषया संदर्भात
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विरोध नोंदवित असून वरील निर्णयात बदल करावेत. बदल न झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, शहराध्यक्ष मनोज पाटील, मुन्ना शर्मा, शाळिग्राम पाटील, डॉ. रवींद्र पाटील, भानुदास कांबळे, पी. वाय पाटील इच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button