? Big Breaking… ही आहेत टीम इंडियाच्या पराभवाची कारणं!
इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. या पराभवाचे विश्लेषण केल्यास आपल्याला अनेक कारणं सापडतील. त्यावर एक नजर…
● भारतीय फिरकीपटूंचे अपयश : रविचंद्रन अश्विन वगळता इंग्लंड फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंची चांगलीच धुलाई केली. शाहबाझ नदीम, वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीचे अपयश संघाला भोवले.
● इंग्लंडच्या फिरकीपटूंचे वर्चस्व : इंग्लंड फलंदाज भारतीय फिरकीपटूंवर वर्चस्व गाजवत असताना विराटसेना इंग्लंडच्या फिरकीत अडकले. विशेष बाब म्हणजे पहिल्या सामन्यात एकूण 11 विकेट फिरकीपटूंनी घेतल्या.
● जो रूटचे द्विशतक : इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पहिल्या डावात शानदार द्विशतकी (218 धावा) खेळी केली. तर दुसऱ्या डावात रुटच्या अर्धशतकाने संघाच्या धावसंख्येला आकार दिला.
● मोठी भागीदारी नाही : इंग्लंडकडून जो रूटने आणि डॉम सिब्लीसह द्विशतकी आणि बेन स्टोक्ससह शतकी भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येचा दिशेने नेले. तर भारताला पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या 119 धावांची भागीदारी वगळता अन्य भारतीय खेळाडू एकही मोठी भागीदारी करू शकले नाही.
● सलामी जोडीचे अपयश : भारताच्या पराभवाचे मुख्य कारण सलामी जोडीचे अपयश आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने दोन्ही डावांमध्ये निराशा केली. तसेच युवा शुबमनला चांगली मिळूनही खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही.






