Maharashtra

स्वस्त धान्य वाटप मधे पारदर्शकता येत नाही तो पर्यंत लढा कायम राहील: राजेश वानखेडे

सावदा प्रतिनिधि यूसुफ शाह

स्वस्त धान्य वाटप मधे पारदर्शकता येत नाही तो पर्यंत लढा कायम राहील: राजेश वानखेडे

महसूल विभागाच्या कारवाईचे जनतेतून स्वागत सावदा: गोर गरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचे स्वस्त धान्य कमी दिले जाते.व या धान्याचा खुल्या बाजारात जादा दराने काळा बाजार केला जातो.या विरूद्ध प्राप्त झालेल्या तक्रारींची दाखल घेऊन महसूल विभागाने कारवाई सुरू केली आहे.याचे आम्ही स्वागत करतो. आणि स्वस्त धान्य वाटप मधील घोळ जो पर्यंत पूर्णपणे संपुष्टात येत नाही व पारदर्शकता येत नाही तो पर्यंत आम्ही आमचा हा लढा कायम लढणार आहोत असे माजी नगराध्यक्ष नगर सेवक राजेश वानखेडे यांनी सांगितले. स्वस्त धान्य वाटप मधे अनेक घोळ होत असून लॉक डाऊन मुळे एप्रिल,मे व जून या तीन महिन्यात मोफत मिळणाऱ्या धान्य वाटप साठी संभाव्य याद्या मधे मोठा घोळ होण्याची शक्यता आम्ही प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या कडे व्यक्त केली होती.त्यानंतर आज महसूल विभागाने स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करून प्रत्यक्ष शिधा पत्रिका धारक यांच्याशी ही बोलून सत्यता पडताळून पाहिली.त्यात तथ्य आढळून आल्याने जे स्वस्त धान्य दुकानदार घोळ करतील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे धोरण प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी अवलंबिले आहे.या कारवाईचे आम्ही तर स्वागत करतोच आहोत.आणि जनताही समाधान व्यक्त करीत आहे. जो पर्यंत स्वस्त धान्य वितरण प्रणालीतील घोळ पूर्णपणे नष्ट होत नाही तो पर्यंत महसूल विभागाने धान्य वितरण कडे लक्ष ठेवावे.गोर गरीबांचे हक्काचा दाना न दाना त्यांना मिळावा यासाठी आम्ही जातीने लक्ष ठेवणे हे लोक प्रतिनिधी म्हणून आमचेही कर्तव्य असल्याने या पुढेही आम्ही जागृत राहणार आहेत असे राजेश वानखेडे यांनी सांगितले.यावेळी नगर सेवक सिद्धार्थ बडगे, कुशल जावळे,बंटी जंगले.आदी.उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button