राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रावेर तालुका व शहर च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार…
भिमराव कोचुरे
रावेर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रावेर तालुका व शहर च्या वतीने नुकत्याच पुणे हडपसर येथे आमदार रोहितदादा पवार यांचे हस्ते जाहीर केलेल्या कार्यकारणीच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती पत्र वाटपाचा व सत्कार अभिनंदनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी, अध्यक्षस्थानी सावदा नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, रा.यु.कॉ. जळगांव जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हाकार्याध्यक्ष दिपक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी,रावेर तालुकाध्यक्ष सचिन पाटील,शहराध्यक्ष प्रणित महाजन,शिक्षक सेल तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील,इरफान मेंबर, सा.न्या.वि.तालुकाध्यक्ष कुणाल महाले,पंचायत समिती सदस्य योगेश पाटील,क.सा.वि.तालुकाध्यक्ष ललित सोनी,रा.कॉ.शहराध्यक्ष मेहबूब शेख मण्यार,अल्पसंख्याक युवा तालुकाध्यक्ष अकिल बेग,विद्यार्थी तालुकाध्यक्ष साईराज वानखेडे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव महाजन,जिल्हाउपाध्यक्ष सतिश फेगडे,जिल्हासरचिटणीस श्रीकांत चौधरी,माजी युवक अध्यक्ष गोपाळ पाटील,चेतन पाटील,मयूर इंगळे,सुनील राऊत,केतन पाटील,किशोर पाटील सुयोग पाटील(सावदा) ज्ञानेश्वर पाटील,धवल पाटील,योगेश नरोटे,गणेश बोरनारे,चावदास पाटील,ललित पाटील, गणेश देवगिरीकर,कांडवेल येथील अविनाश पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटल चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






