Amalner

Amalner: माजी आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी 5 कोटी रस्ते व हायमस्ट साठी 3 कोटी असे एकूण 8 कोटी अमळनेर नगरपरिषद च्या कामांना मंजूरी

Amalner: माजी आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी 5 कोटी रस्ते व हायमस्ट साठी 3 कोटी असे एकूण 8 कोटी अमळनेर नगरपरिषद च्या कामांना मंजूरी

व्यापारी,विक्रेते व नागरिकांची समस्या सुटणार

अमळनेर-शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील रस्ते म्हणजे “नको रे बाबा” अशी गत झाली असताना या परिसरात आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातुन त्रिमिक्स पद्धतीच्या नव्या रस्त्यांची अनमोल भेट मिळणार असुन वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत 5 कोटी निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती माजी आमदार श्री चौधरी यांनी दिली.या सोबतच शहरात हायमास्ट लाईट साठी 3 कोटी निधी मिळविला असल्याचे त्यांनी सांगितले.
या नव्या रस्त्यांमुळे मार्केट परिसरातील व्यापारी,विक्रेते व नागरिकांची कायमची समस्या सुटणार आहे.विशेष म्हणजे सदरचे रस्ते ट्रीमिक्स काँक्रीटीकरणासह सोबत दुभाजक व फुटपाथ देखील होणार आहे.याबाबतचा शासननिर्णय दि 31 जुलै रोजी प्रसिद्ध झाला असून अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून एकूण चार महत्वपूर्ण रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत.सदर रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने नागरिकांचे होणारे हाल लक्ष्यात घेता प्रभाग क्र 9 च्या नगरसेविका सौ कल्पनाताई पंडित चौधरी यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कडे वारंवार पाठपुरावा करुण मा आमदार शिरीश चौधरी यांच्या मार्फत दि 1 मार्च 2023 रोजी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे व मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन बाजरपेठ परिसरातील सहा रस्त्यांना 6 कोटी 80 लक्ष निधीची मागणी केली होती.यासाठी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या वारंवार भेटी घेऊन योग्य तो पाठपुरावा त्यांनी केल्याने शासनाने यापैकी चार रस्त्यांना मंजुरी देऊन 5 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.लवकरच या रस्त्यांची टेंडर प्रोसेस व वर्क ऑर्डर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

हे होणार रस्ते…

सदर पाच कोटी निधीतून विजय फरसाण ते विजय शॉपी पर्यंत ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण रस्ते दुभाज फुटपाथ करणे(1 कोटी 50 लक्ष),गीता प्रोव्हिजन ते पाच पावली देवी मंदिरापर्यंत पर्यंत ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण रस्ते दुभाज फुटपाथ करणे(1 कोटी 40 लक्ष),डॉ अंजली चव्हाण यांच्या रुग्णसेवा हॉस्पिटल पासून दुर्गा टी डेपो पर्यंत पर्यंत ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण रस्ते दुभाज फुटपाथ करणे(1 कोटी),स्टेट बँक ते बस स्टॅन्ड पर्यंत पर्यंत ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण रस्ते दुभाज फुटपाथ करणे(1 कोटी 50 लक्ष) आदी रस्त्यांची कामे होणार आहेत.

सदर महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याने व्यापारी बांधव,विक्रेते व नागरिक यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.तर शिरीष चौधरी यांनी अमळनेर जनतेच्या वतीने सदर मंजुरी बद्दल मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना गिरीशभाउ महाजन ,जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.सदरची कामे अतिशय चांगल्या दर्जाची होतील असा विश्वास देखील श्री चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

हायमास्ट साठीही मिळविले तीन कोटी

माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शहरात विविध परिसरात हायमास्ट लाईट साठी तीन कोटी निधी यापूर्वीच मंजूर करून आणला असून ती कामे देखील आता सुरू होणार आहेत.रस्त्यांसाठी 5 कोटी व हायमास्ट साठी 3 कोटी असे एकूण आठ कोटी शहरासाठी मिळविण्यात श्री शिरीश चौधरी व गटनेते बबली पाठक सर्व नगरसेवक यांना यश आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button