Health: आरोग्याचा मुलमंत्र..दात दुखी आणि काही सोप्पे उपाय
दातांचे दुखणे सहजा-सहजी जात नाही. दातदुखीचा त्रास एकदा सुरू झाला की, दुर्लक्ष करून चालत नाही. दात दुखीचा त्रास सुरू झाला की डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. डॉक्टरांकडे लगेच जाणे शक्य नसेल तर काही घरगुती उपाय करून तात्पुरता आराम मिळून शकता. दातदुखी हा लपलेला शत्रू असतो. कारण, एकदा दात दुखायला लागले की धष्ट पुष्ट पहिलवान सुद्धा लहान मुलासारखा रडू लागतो. म्हणून चाला तर मग बघूया काही घरगुती उपाय
1) लवंग तेल :-
दातामध्ये दुखत असेल तर तुम्ही कापसाच्या मदतीने लवंग तेल वापरावे
तुम्ही पोटात हे तेल जाऊ देऊ नये याची काळजी घ्या. थोडा वेळ दुखत असलेल्या दाताला लवंग तेल लावलेला कापूस लाऊन ठेवा
नंतर चूळ भरा
दिवसातून तुम्ही हा प्रयोग साधारण तीन ते चार वेळा करू शकता. यामुळे दातदुखी कमी होण्यास मदत मिळते
याशिवाय दुखत असलेल्या दातामध्ये तुम्ही अख्खी लवंगही ठेऊ शकता. काही वेळातच दात दुखी कमी होण्यास मदत मिळते.
हिंग :-
हिंगा मध्ये अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असल्या मुळे दातांच्या वेदने वर अत्यंत गुणकारी असते.
हिंगामध्ये पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्या
मग ही पेस्ट दातदुखीवर कापसाच्या मदतीने लावा
दात दुखायला लागल्यावर तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.
3) खायचा सोडा
हा अत्यंत गुणकारी उपाय असून यातही जिवाणूनाशक गुण आहेत.
कापूस पाण्यात भिजवा आणि मग त्यावर बेकिंग सोडा लावा
बेकिंग सोडा लावल्यावर मग दुखत असणाऱ्या दाताला लावा
ही प्रक्रिया तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करा
हवं तर तुम्ही कोमट पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करून चूळ भरू शकता.
एवढ्यावर सुद्धा त्रास होत असेल तर ताबडतोब दंत रोग तज्ञाला भेटा…
डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )






