Paranda

ज्यांना देव बनायचे आहे त्यांनी घाव सोसले पाहिजेत ह भ प संजय महाराज पाचपोर

ज्यांना देव बनायचे आहे त्यांनी घाव सोसले पाहिजेत ह भ प संजय महाराज पाचपोर

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

पंरडा ( सा.वा ) दि. १६

भगवंताचे नामचिंतन हे साधन सर्वांना सहज व सुलभ करता येते. ज्ञान टिकवण्यासाठी जिवनामध्ये वैराग्याची नितांत गरज असते. असे मत हभप संजय महाराज पाचपोर त्यांनी व्यक्त केली. भगवंताचे दास्यत्व स्वीकारल्यानंतर भगवान परमात्मा आपल्या मागे व पुढे उभा राहतो त्यामुळे भगवंताचे दास्यत्व आपण स्वीकारले पाहिजे.

ज्यांना देव बनायचे आहे त्यांनी घाव सोसले पाहिजेत ह भ प संजय महाराज पाचपोर

परंडा तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने यावर्षी संत शिवराम बुवा मठ परंडा याठिकाणी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वेदांताचार्य ह भ प वै. गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरण याच्या निमित्ताने अखंड हरिनाम आयोजित करण्यात आला आहे .

ज्यांना देव बनायचे आहे त्यांनी घाव सोसले पाहिजेत ह भ प संजय महाराज पाचपोर

यामध्ये पाचव्या दिवसाची कीर्तनसेवा ह भ प गुरुवर्य संजय महाराज पाचपोर अकोला यांची संपन्न झाली. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील पाटील कृषी व पशु संवर्धन जिप सभापती दत्ता साळुंखे ,शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके ,काकासाहेब साळुंखे , शिवाजी चव्हाण, ह भ प रामभाऊ महाराज निंबाळकर, ह भ प मारुति महाराज तुनतुने शास्त्री ,ह भ प गणेश महाराज पाटील ,ह-भ-प दयानंद महाराज नाईकवाडे, ह भ प विठ्ठल महाराज पाटील ,गोपीनाथ महाराज बानगुडे ह भ प नवनाथ महाराज साठे, ह-भ-प सतीश महाराज सूर्यवंशी ,ह भ प दत्ता महाराज हुके, हभप राम महाराज काजळे, हभप विष्णु महाराज गोंडे, ह भ प भागवत महाराज कबीर, ह-भ-प नागेश महाराज मांजरे ह-भ-प कुमार महाराज केमदारणे , ह भ प बिभिशन महाराज गिलबिले, ह भ प गणेश महाराज कोल्हे ,हभप दत्ता महाराज वाघ ,दीपक थोरबोले हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button