जय भवानी मित्र मंडळ पवार वाडी. चाळीसगाव तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ७५०० रुपये
प्रतिनिधी मनोज भोसले
चाळीसगाव – सपूर्ण जग कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहार महाराष्ट्र राज्य सरकार देखील कोरोना विषाणू ला आळा घालून त्यावर मात करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करत आहे यासाठी मोठया निधीची आवश्यकता आहे. शासनाच्या मदतीत खारीचा वाटा म्हणून देशासाठी एक हात मदतीचा या उदात्त हेतुने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस चाळीसगाव येथील जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने ७५०० रुपयांचा धनादेश दि ११ रोजी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या कडे सुपर्द करण्यात आला.यावेळी तहसीलदार अमोल मोरे उपस्थित होते
शहरातील पवारवाडी येथे जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवाची परंपरा सलग ४२ वर्षांपासून अबाधित असुन नवरात्र उत्सवात आकर्षक नवदुर्गा देवीची मूर्तीची स्थापना करून ९ दिवस विवीध सांस्कृतिक कार्यक्रम ,कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन मंडळातर्फे करण्यात येतात
मंडळाच्या माध्यमातून पवारवाडी येथे भव्य विठ्ठल रुख्मिणी मंदिर. सभामंडप उभारण्यात आले आहे आषाढी एकादशी ला देखील महाप्रसादाचे वाटप करण्यात येते याचा लाभ परीसरात भाविक भक्त घेतात शिवाय मंडळाच्या वतीने शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुंटुबांना १५००० रुपये मदत केली आहे अशा विविध कार्यक्रमातून सामजिक दातृत्व जोपासत मंडळाची वाटचाल सुरु असुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक छोटी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने दि ११ रोजी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या कडे ७५०० रुपयांचा धनादेश सुपर्द करण्यात आला.
यावेळी गणेश पवार ,सतिश पवार ,अनिल पवार, योगेश गव्हाणे, शरद पवार ,दिलीप पवार, मच्छिंद्र पवार, किरण पवार ,रामलाल पाटील ,श्याम घाडगे, प्रशांत पवार, अनिल पवार, रमेश पवार ,चेतन पवार, दत्तात्रय देठे ,अर्जुन पवार ,खुशाल तलरेजा ,अमोल पवार, बाळासाहेब पवार ,कैलास पाटील, राम देठे, विजय पवार ,नाना पवार ,रामदास पवार ,भिकन पवार ,सागर यादव, स्पन्निल गायकवाड यदि मंडळाच्या सदस्यांनी निधी साठी आर्थिक मदत दिली आहे






