Amalner

दिलाचे Talk…फालतू “ती”….! की…?

दिलाचे Talk…फालतू “ती”….! की…?

ती बाहेर पडताना तो तिला म्हणाला पदर जरा सावरून घे..!

ती म्हणाली माझं मी बघेन रे तू तुझी मळलेली नजर जरा स्वच्छ करून घे..!

प्रा जयश्री दाभाडे

ती तशी नीट नेटकी राहणारी..आजही ती घराबाहेर पडली.साधीच पण टाप टिपीने राहणारी..कपाळावर छोटी टिकली..हातात छोटसं घड्याळ..लांब सडक काळेभोर केस..वेणीत गुंफलेले..त्यावर सुंदर गुलाबाचं फुल…डोळ्यात काजळाची छोटी रेघ…उंच सडपातळ बांधा.. चार चौघात उठून दिसणारी…

ती निघाली नेहमी प्रमाणे… घरातलं आवरून कामावर जायला..तशी तिची रोजचीच धावपळ..घर,कुटुंब,ऑफिस सांभाळून रोजच तारेवरची कसरत.. पण नेहमी हसत मुख..प्रसन्न व्यक्तिमत्व,मन मोकळा स्वभाव अशी ती..

घर आणि ऑफिस च्या धावपळीत स्वतः कडे लक्ष तर दिलंच नाही..पण तरीही ती तिचं आयुष्य आणि तिचं काम नियमितपणे करणारी…यशस्वी काम कारकीर्द असणारी..म्हणूनच कदाचित अनेकांच्या नजरेत खटकणारी..

ती रस्त्याला लागली आणि आपल्याच धुंदीत विचारात रस्ता वेगाने कापून कामाच्या ठिकाणी पोहण्याची घाई असल्याने पाऊले आपोआपच वेगात पडत होती.नेहमी प्रमाणे कुजका आणि हेटाळणीचा टोमणा कानावर आला…अरे बघ रे ही..साली फालतू आहे…! अरे यार काय चीज आहे का.. यार साली हातात येत नाही..!कुत्रीचे नखरे तर बघ यार..! आई शपथ एकदा हातात आली ना यार मग बघ सालीला कशी मर्दानगी दाखवतो…! हो ना यार साली त्या दुसऱ्या मादरचोद बरोबर गुलुगुलू बोलत होती…!आमच्याशी बोलायला काय हिला काटे टुचतात का..?

एक ना दोन..! टोमणे कानावर पडत होते..!हे आजच नाही तर जशी ती या भागात राह्ययला आली तशी तिच्या वर ती फालतू असल्याचा शिक्का ह्या समाजाच्या ठेकेदारांनी स्व मर्जीने लावून टाकला..! आजूबाजूच्या महिला देखील तिच्या कडे थोडं इर्षेने,जळाऊ वृत्ती ने पाहत असत..कारण ती कमावती… काम करणारी..बाहेर पडणारी… त्या सर्व घर काम करणाऱ्या..मग काय…ह्या काम करणाऱ्या बाया अशाच..घरच्या जबाबदाऱ्या नको…नटून थटून बाहेर पडायला पाहिजे..काय माहीत कोणतं काम करतात..एक ना दोन अर्थ शून्य प्रतिक्रिया ह्या नेहमीच्या ठरलेल्या..!

स्त्री मग कोणतीही असो ती कामा साठी बाहेर जाते याचा अर्थ ती फालतू होत नाही..!ती काय सार्वजनिक मालमत्ता होत नाही..!ती थोडी हसली,मन मोकळी बोलली म्हणजे तिचं चारित्र्य च खराब आहे असं होत नाही..! ती एक मानवी जीव आहे तिलाही मन आहे.. भावना आहेत.! तिच्या प्रत्येक गोष्टी वर बंधन का असावं..!तिनं काय कपडे परिधान करावे..! तिचं वागणं बोलणं कस असावं ह्या साठी नियम का…? ती एक व्यक्ती म्हणून मन मोकळे पणाने स्वतंत्र का जगू शकत नाही..?

ती जास्त हसली तरी प्रॉब्लेम..! ती कमी हसली तरी समस्या..! जास्त बोलली तर दिड शहाणी आहे ..! कमी बोलली तर खुद पसंद आहे..! तुम्हाला ,तुमच्या चांगल्या कामाला रिप्लाय दिला तर लगेच हं मासा गळाला लागतो आहे म्हणून मित्रांमध्ये टिंगल टवाळी..! नाही च काही केलं तर अरे यार फार माज आलाय तिला..!

असे म्हणतात कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात..मग बदनामी सुरू केली जाते..!तिने रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन राहू नये..! कोणतेही मेसेज टाकताना तिने 100 वेळा विचार करावा..! कारण ती काम न करता तीच लफडं असावं असं सरार्स गृहीत धरून तीच ऑनलाइन राहणं गैर मार्गाने विचारात घेतले जाते..!लोकं काय म्हणतील..? ह्याचा विचार फक्त तिनेच करावा..! पुरुषांना तो नियम लागू नाही..!

थोडस कुणाशी बोलली तर अरे बघ यार काय पाहिलं त्याच्यात आम्ही काय मरून गेलो होतो..! कधी बदलणार आपण ही मानसिकता..! कधी एक उत्कृष्ट हेल्दी वातावरण महिलांना आपण निर्माण करून देऊ शकू..! ती जेंव्हा केंव्हा घरा बाहेर पडेल तेंव्हा ती फालतू च आहे..! ही मानसिकता बदलून तिला सुरक्षित वाटणं आवश्यक आहे..!नवरात्रीत दगडाच्या देवीची पूजा करून जिवंत स्त्री ला अपमानित करणे..! तिला फालतू समजणे हा विरोधाभास भारतात मोठ्या प्रमाणात आढळून येतो.बघा पटतंय का..! आज ती बाहेर पडते आहे उद्या तुमचीही कोणीतरी बाहेर पडेल..! तेंव्हा असंच फालतू समजणार का..! की जे बोलतात त्यांना समजवणार की मारणार..! हा नियम आपल्या सर्वांनाचं लागू होतो..! निसर्ग नियम आहे ना ..! आज मेरी तो कल तेरी बारी हैं..! चला तर मग मानसिकता बदलु या स्त्री चा सन्मान करू या..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button