Maharashtra

नववधूचा खुन करणाऱ्याला फाशी द्या शिवसेनेची मागणी

नववधूचा खुन करणाऱ्याला फाशी द्या – शिवसेनेची मागणी

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

चाळीसगाव :- येथील शिवसेना महिला आघाडी तर्फे तहसीलदार अमोल मोरे यांना वैष्णवी नारायण गोरे रा. मंठा जि. जालना या नवविहाहीत व तिचा कुटुंबाला न्याय मिळावा मागणी करत निवेदन देणयात आले.

शिवसेनेच्या वतीने निवेदनात असे की, जालना जिल्ह्यातील मंठा या गावात वैष्णवी नारायण गोरे या मुलीच्या एका नराधमाने दिवसाढवळ्या भर रस्त्यात खून केल्याची घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे तिच्या पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदा ती माहेरी आली होती. तिचे वडील रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होते आर्थिक परिस्थिती अतिशय़ गरिबीची आहे. अशा परिस्थितीत त्यांनी मुलीचे लग्न केले लग्नानंतर पाच दिवसांनी त्यांना आपल्या मुलीच्या दुर्दैवी अंत बघावा लागला.

आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक मुलीला सुरक्षितता वाटली पाहिजे प्रत्येक स्त्री ला निर्भयपणे जगता आले पाहिजे असा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होणे गरजेचे आहे. अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. उद्धव साहेब ठाकरे व पालक मंत्री मा गुलाबरावजी पाटील याचांकडे तिला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करणार आहेत.

आम्ही शिवसेना महिला आघाडी व पदाधिकारी या घटनेचा निषेध करीत असुन संबंधित आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी विनंती करीत आहोत, या गोष्टीची ताबडतोब कार्यवाही न केल्यास आम्ही सर्व नारी शक्ति या पुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आहोत.

यावेळी उपस्थित महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख प्रतिभा पवार, चाळीसगाव उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, एसटी कामगार सेनेचे रघुनाथ कोळी, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, बापू लेनेकर, दिनेश विसपुते, सोनू महाजन, संगीता साळुंखे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button