गांडोळे ता दिंडोरी प्रतिनिधी दीपक भोये
बा-हे ग्रुप ग्रामपंचायत आयोजित चौक नामकरण सोहळा आज बा-हे येथे पंचक्रोशीतील नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. आदर्श शिक्षक निसर्गवासी चव्हाण गुरुजी यांच्या सन्मानाप्रित्यर्थ ग्रुप ग्रामपंचायत बा-हे यांनी नागरिकांच्या आग्रहास्तव ग्रामसभेत ठराव करून चव्हाण सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला आदरांजली देण्यासाठी बा-हे हुन नाशिकला जाणाऱ्या रस्त्यावरील चौकास “आदर्श शिक्षक श्री चव्हाण गुरुजी चौक” असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता व त्यानुसार दि. 9 रोजी हा सोहळा पार पडला या सोहळ्यास आकाशातून पावसाची संतत धार लागलेली असतानाही पंचक्रोशीतील नागरिकांचा लक्षणीय सहभाग लाभला.
ह्या चौकाचे फलक अनावरण मा. अमृत महाले, मा.परशराम वार्डे, व मा लोखंडे (API) या त्रयींद्वारा करण्यात आले. दरम्यान देविदास गावित व चिंतामण वार्डे यांनी निसर्गवासी चव्हाण गुरुजींच्या कार्यास व आठवणींस उजाळा दिला. ह्या कार्यक्रमास दिपक भोये, श्रीकांत पवार, दत्तात्रेय पवार, मनोहर महाले, वसंत राऊत बा-हे केंद्रातील सहकारी शिक्षक,बा-हे पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी ,रामदास देशमुख, सचिन महाले, मुरलीधर धूम, यशवंत गावित,सुरेश महाले, सचिन महाले, गंगाराम जाधव, जगदीश पाडवी,पांडुरंग धूम,अतुल बोरसे,राकेश जाधव, अनिल जाधव, रामदास गायकवाड, नामदेव पाडवी, बा-हे ग्रामपंचायत चे सर्व सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर देविदास देशमुख यांनी उपास्थितांचे आभार मानले.








Thanks…