Amalner: वाढत्या चोऱ्यांच्या अनुषंगाने प्रतापनगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी नागरिकांची घेतली बैठक..
अमळनेर शहरातील श्रीमंत प्रतापसेठ नगर,प्रताप मिल परिसरात मागील काही महिन्या पासून सतत रात्री अपरात्री घरफोड़ी/चोरीचे प्रमाण वाढत आहेत या सर्व प्रकारावर आपल्या परिसरात सुरक्षा/सुरक्षितता जरूरी असल्याने दि 5 सप्टेंबर रोजी रात्री ठीक ७ वाजता श्री संकट मोचन हनुमान मंदिर येथे प्रताप मिल परिसरातील नागरिकां सोबत अमळनेर भाग उपविभागीय पोलिस अधिकारी श्री राकेश जाधव साहेब यांच्या अधिपत्याखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत राकेश जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नागरिकांशी हितगुज साधताना उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी नागरिकांनी सतर्क रहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणीही अपरिचित व्यक्ती परिसरात आढळल्यास पोलिसांना संपर्क साधावा. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात cctv लावावेत.जेणेकरून चोरांना ओळखता येईल.चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल.अमळनेर शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी cctv लावल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. कॉलनी भागातील सुशिक्षित नागरिकांनी आपापल्या परिसरात जास्तीत जास्त cctv बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
यावेळी परिसरातील सर्व जबाबदार नागरिक यानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






