Amalner

अमळनेर उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी (हेल्मेट) शिरस्त्राण सक्ती चे काढले आदेश 10 फेब्रुवारी 2020 पासून हेल्मेट न घालणाऱ्या वर  कायदेशीर कार्यवाहिला होणार सुरुवात

अमळनेर उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी (हेल्मेट) शिरस्त्राण सक्ती चे काढले आदेश

10 फेब्रुवारी 2020 पासून हेल्मेट न घालणाऱ्या वर कायदेशीर कार्यवाहिला होणार सुरुवात

प्रा जयश्री साळुंके

अमळनेर येथिल उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी हेल्मेट वापरा संदर्भात सक्तीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मा खा उन्मेष पाटील,लोकसभा सदस्य व मा खा रक्षा खडसे लोकसभा जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी यांनी दि 29 जाने 2020 रोजी रस्ता सुरक्षा अपघात अंतर्गत समस्या आणि उपाय योजना यासाठी बैठक संपन्न झाली.

अमळनेर उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी (हेल्मेट) शिरस्त्राण सक्ती चे काढले आदेश 10 फेब्रुवारी 2020 पासून हेल्मेट न घालणाऱ्या वर  कायदेशीर कार्यवाहिला होणार सुरुवात

या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार सर्व शासकीय कार्यालयात अधिनस्त अधिकारी कर्मचारी व येणारे नागरिक यांना हेल्मेट शिरस्त्राण सक्तीचे करण्याबाबत आदेशीत केले आहे. तरी सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दि 10 फेब्रुवारी 2020 पासून शिरस्त्राण न घालणाऱ्या वर पोलीस विभागा मार्फत कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे असे उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी कळविले आहे.तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button