Amalner

Amalner: अर्बन बँक निवडणुकीत चार अर्ज बाद..!

Amalner: अर्बन बँक निवडणुकीत चार अर्ज बाद..!

अमळनेर अर्बन बँकेच्या निवडणुकीत छाननीच्या दिवशी बँकेत ठेव नसल्याच्या कारणावरून निवडणूक अधिकाऱ्यांनी चार अर्ज अवैध ठरवले आहेत.
अर्बन बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे छाननी कडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यात संचालक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या सर्वसाधारण उमेदवारांची बँकेत २५ हजार रुपये तर राखीव मतदारसंघासाठी १२ हजार ५०० रुपये ठेव असणे गरजेचे आहे. बँकेच्या नियमावलीत तशी तरतुद करण्यात आली आहे. म्हणून सर्वसाधारण मतदार संघात तिलोत्तमा चुडामन पाटील, संदीप युवराज पाटील,सुनील रामचंद्र पाटील यांची २५ हजार रुपये ठेव नसल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.

मात्र तिलोत्तमा पाटील यांचा महिला राखीव मतदार संघात आणि संदीप पाटील यांचा इतर मागासवर्गीय मतदार संघात अर्ज मंजूर करण्यात आला. तर अनुसुचित जाती जमाती मतदारसंघात रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी १२ हजार ५०० रुपये ठेव न भरल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button