Manmad

वी.लिं. गवळी समाजात आर्दश विवाह संपन्न

वी.लिं. गवळी समाजात आर्दश विवाह संपन्न

मनमाड I आप्पा बिदरी

मनमाड शहर वीरशैव लिंगायत गवळी बांधव समाज कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसून येतात.मनमाड शहर गवळी समाजातर्फे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाने संचारबंदी आणि ताळेबंदी घोषित केले. यामुळे सामुहिक कार्यक्रम होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत मनमाड वीरशैव लिंगायत गवळी समाजात अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांमध्ये समाजातील एका जोडप्याचे लग्न लावून वी.लिं. गवळी समाजाने सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या ५० दिवसा पासुन सुरु असलेल्या लाॕकडाऊन मध्ये कित्येक लग्न हे रद्द करण्यात आले. मात्र या अडचणीत देखील पर्याय म्हणून शासनाने ठरवुन दिलेल्या नियमानुसार वेगवेगळ्या समाजात विवाह होत आहे. असेच गवळी समाजातील देखील नव वधु – वरांचे मोठ्या प्रमाणात लग्न ठरलेली होती.या अडचणीवर पर्याय देखील आहे. हे दोन्ही पक्षाच्या लक्षात आले असता ? वर व वधु पक्षाने सामजस भुमिका घेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत येथील शंकरआप्पा हुच्चे यांची कन्या ज्योती व धुळे येथील लक्ष्मणआप्पा यमगवळी याचे चिरंजीव चेतन यांचा विवाह सोहळा घराजवळ 20 लोकांच्या उपस्थितीत संप्पन्न झाला. या विवाह सोहळस राजु जोमिवाळे,अनिल जोमिवाळे,नितीन वाघ, मनमाड येथील महाराष्ट्र गवळी समाज सघंटनेचे उपअध्यक्ष वसंतनाना हि.नामागवळी, नगरसेवक कैलास हिरणवाळे,भिमादादा हिरणवाळे व जेष्ठ कारभारी पंच ठकाजीआप्पा दहिंहंडे,रामआप्पा नामागवळी, भिकाआप्पा हिरणवाळे ,नितीनभाऊ लगडे व ईतर मान्यवर उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या काळात देखील आपल्या मुलीचे व मुलाचे लग्न संप्पन्न झाले याचा आनंद दोन्ही परिवारच्या चेहऱ्यावर लपत नव्हता .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button