व्हायरल कट्टा..माय बॉडी माय चॉईस….स्त्रिया टॉपलेस तर पुरुषांनी बिकिनी घालून स्त्री पुरुष समानतेसाठी केले अनोखे अंदोलन
बर्लिन स्त्री-पुरुष समानतेसाठी वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवला जातो. अनेकदा समान हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आंदोलनंही होतात. मात्र विचित्र पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. याचं कारणही खास आहे. महिलांनी टॉपलेस होऊन तर पुरुषांनी ब्रा घालून रस्त्यावर सायकलिंग करत आंदोलन केलं.
या अनोख्या आंदोलनाची सोशल मीडियावर तर चर्चा होत आहेच मात्र संपूर्ण जगाचं लक्ष या आंदोलनानं वेधून घेतलं. शनिवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये झालेल्या एका अनोख्या आंदोलनाचे फोटो व्हायरल होत आहेत. पुरुषांना ब्रा आणि बिकनीमध्ये पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला.
‘माय बॉडी, माय च्वाइस’
बर्लिनच्या रस्त्यावर शेकडो लोक लैंगिक समानतेच्या मागणीसाठी उतरल्याचं पाहायला मिळालं. एका फ्रेंच टॉपलेस महिलेला पोलिसांनी वॉटर पार्कमधून बाहेर काढल होतं. ही घटना जरी मागच्या महिन्यातील असली तर लैंगिक समानतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाल्यानं चिडलेले नागरिक रस्त्यावर उतरले. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून हे आंदोलन करण्यात आलं.
रस्त्यावर उतरून घोषणाबाजी किंवा तोडफोड न करता विचित्र पण वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पुरुषांनी ब्रा बिकनी तर महिलांनी टॉपलेस होऊन हे निदर्शन केलं. महिलांनी या निदर्शनात सहभाग घेत आपल्या शरीरावर ‘माय बॉडी, माय चॉइस’ असे घोषवाक्यही लिहिल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय आहे प्रकरण?
एक महिला स्विमिंग सूट घालून आपल्या दोन मुलांना घेऊन मित्रासोबत स्विम पार्कमध्ये गेली होती. तिथे टॉपलेस होऊन सनबाथ घेत असताना पोलिसांनी तिला स्विम पार्कमधून बाहेर काढलं. पुरुष विनाकपडे राहू शकतात तर महिला का नाही असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला.या मुद्द्यावरून संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे तर भारतातील महाराष्ट्रात देखील हेमांगी कवी ह्या मराठी अभिनेत्री च्या बाई ब्रा आणि बुब्ज हा वाद निर्माण झाला आहे.






