Nashik

गांधीनगर मुद्रणालय पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा एकतर्फी विजय, कामगार पॅनलचा उडाला धुव्वा

गांधीनगर मुद्रणालय पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा एकतर्फी विजय,
कामगार पॅनलचा उडाला धुव्वा

नाशिक शातांराम दुनबळे

नाशिक= गांधीनगर येथील दि. गव्हरमेंन्ट ऑफ इंडिया प्रेस एम्प्लॉईज को – ऑप क्रेडिट सोसायटी लि.च्या सन २०२२- २०२७ च्या पंचवार्षिक निवडणूकीत “परिवर्तन”पॅनलने कामगार पॅनलचा सुफडा साफ केला.सत्ताधारी कामगार पॅनलच्या पदरात फक्त एक जागा पडली तर नवीनच तयार झालेल्या परिवर्तन पॅनलवर भरोसा ठेवीत सभासदांनी चौदा जागांचे भरघोस दान दिले. एकूण १५ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात होते.फक्त अनुसूचित जाती जमाती मतदार संघात काट्याची टक्कर झाली यात शेवटी दीपक पुंडलिक घोलप यांना विजयी घोषित केले गेले (पराभूत मिलिंद एकनाथ निकुंभ), तर विमुक्त/भटक्या जाती मतदार संघातून परिवर्तन पॅनलचे सुधीर आनंदराव जोशी यांनी विजय मिळविला,(पराभूत…राजेश सानप).
इतर मागासवर्गीय गटातून नवख्या दिलीप त्र्यम्बक बोराडे यांनी चालू युनियन जनरल सेक्रेटरी रवी अवारकर यांचा दारुण पराभव केला.तर दोन जागांसाठी असलेल्या महिला राखीव
गटात सौ.नीता मिलिंद शिरसाठ यांनी संगीता कोकाटे (कामगार पॅनल) यांचा पराभव केला.तर कामगार पॅनलच्या गीतांजली कोरडे ह्या एकमेव विजयी उमेदवार ठरल्या.
सर्वसाधारण मतदार संघातील दहा जागांसाठी दोन्ही पॅनल मिळून वीस उमेदवार आपले भाग्य अजमावित होते.परंतु सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला व हिटलरशाहीला कंटाळून ह्या वेळी मतदारांनी परिवर्तन पॅनलला एकतर्फी सत्ता देऊन,सत्ताधाऱ्यांची ३५ वर्षाची एकाधिकारशाही संपुष्टात आणून कामगार पॅनलच्या सर्व उमेदवारांचा धुव्वा उडवित दारुण पराभव केला.

परिवर्तन पॅनलचे सर्वसाधारण गटातील सर्वच उमेदवार विजयी झाले. त्यात कैलास रमाकांत अवारे,कुंदन
प्रभाकर गायकवाड,गोकुळ मुरलीधर बोराडे,चेतन सुभाष दाणी,प्रमोद शंकरराव पवार,संदीप गणपत गायकवाड,बाळू काशिनाथ भांगरे,
प्रवीण विजय पवार,गणेश काशिनाथ रोकडे,व शेखर बाबुराव साळुंके इ.
विजयी झाले.तर पराभुतांमध्ये भरत भगवान भोगले,शेख समद मुनाफ,
लालितकुमार निरखेडे,देवेंद्र जयवंत
पगारे,भालचंद्र परचुरे,सुनील मुरलीधर पवार,रमेश राजा मकवाणा,सुधीर बालाजी मिसाळ,व्यंकटेश के एस.,व
प्रशांत जगन्नाथ भराडे यांचा दारुण पराभव झाला.
गांधीनगर वेल्फेअर क्लब हॉल येथे मतमोजणी झाली.निवडणूक निर्णय अधिकारी तालुका उपनिबंधक कार्या लया श्री कैलास आढाव व यांच्या सहकाऱ्यांनी विजयी उमेदवारांची नावे घोषित केली.त्यानंतर गुलालाची उधळण करीत,फटाक्यांची आतिषबाजी करून सर्वांनी जल्लोष केला.
निवडणुकीचा संपूर्ण कौल परिवर्तन पॅनलच्या बाजूला झुकल्याने सत्ताधाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. तर परिवर्तन पॅनलच्या आनंदात सभासदांनी घोषणांचा जल्लोष करीत विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.विजयासाठी कवी अशोक भालेराव, शिवपाल पंचभाई,
अनिल गायकवाड, लीलाधर चिखले,
दीपक शिर्के,देवेंद्र जाधव,जितेंद्र गवारे व शांताराम रूपवते,दीपक गायकवाड, रामकृष्ण शिरोळे,सोनू गंभीरे,रवींद्र महाले,अशोक परदेशी सह अनेकांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button