Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचा निर्णय समन्वय साधून लवकर सोडवावा अन्यथा आंदोलन – रयत सेनेचा ईशारा

छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचा निर्णय समन्वय साधून लवकर सोडवावा अन्यथा आंदोलन – रयत सेनेचा  ईशारा 

छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचा निर्णय समन्वय साधून लवकर सोडवावा अन्यथा आंदोलन - रयत सेनेचा ईशारा

चाळीसगाव – प्रतिनिधी मनोज भोसले
चाळीसगाव शहर व तालुक्यातील तमाम शिवप्रेमी यांच्या अस्मिता व जिव्हाळ्याचा विषय असलेल्या  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा संदर्भात चाळीसगाव नगर परिषदेच्या  सत्ताधारी स्थायी समिती नगरसेवकांमध्ये समन्वय दिसुन येत नाही पुतळ्याची फेर निविदा काढण्यासाठी कोरम अभावी स्थायी समितीची सभा एकाच आठवड्यात दोनदा तहकूब करावी लागली ही महापुरुषांच्या विचाराणा तिलांजली दिल्या सारखेच आहे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात राजकारण होत असल्याचे यावरून दिसुन येत असल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे म्हणून जनभावना लक्षात घेऊन या विषयी तात्काळ निर्णय घेऊन निविदा काढुन स्थायी समिती सभेत मंजूर करून नियोजित जागी छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिंगल पॉईंट) येथे पुतळा उभारण्यासाठी नगराध्यक्षा व  खासदार उन्मेशदादा पाटील यांनी या विषयात लक्ष घालून सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व शिवप्रेमी जनतेची आग्रही मागणी पूर्ण करण्यासाठी शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर साकारण्यात यावा अशी मागणी रयत सेनेच्या  वतीने न पा नगराध्यक्षा सौ  आशालता चव्हाण यांच्याकडे दि २३ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली असुन असे न झाल्यास न पा समोर बेमुदत आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की  न पा च्या वतीने  १९ ऑगस्ट रोजी  स्थायी समितीची सभा आयोजित केली होती या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची निविदा संदर्भात एकमुख्यी  निर्णय होईल अशी अपेक्षा शिवप्रेमी जनतेमध्ये होती मात्र  सत्ताधारी गटाचे स्थायी समिती सदस्य अनूपस्थित राहील्याने इतर विषयांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा निविदा बाबत निर्णय होऊ शकला नाही कोरमअभावी  सभा तहकूब करण्यात आली एकाच आठवड्यात तब्बल दोनदा सभा  तहकूब झाल्याने स्थायी समिती सदस्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्या बाबत गांभिर्य दिसत नसल्याचे यावरून दिसत आहे. सर्व धर्म आणि पंथातील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी सुराज्य निर्माण करीत भारतीय इतिहासाला कलाटणी दिली म्हणूनच शिवराय आपल्यातुन जाऊन तीनशे ते साडेतीनसे वर्षे झाली तरीही त्यांच्या नावाचा आजही उत्स्फूर्तपणे जयघोष सुरू आहे त्यांचे नाव जरी घेतले तरी नसानसांच्या धमन्यां मधील रक्त सळसळते मग या स्वाभिमान व अभियान असलेल्या शिवरायांच्या पुतळ्या विषयी राजकारण करून वेळकाढूपणा का केला जात आहे  शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात शिवाजी महाराजांचा पुतळा होण्यास संघर्ष करावा लागत असेल तर निश्चित कुठे तरी सत्ताधारी स्थायी समिती नगरसेविकानी आत्मपरिक्षण करण्याची  गरज असुन  छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण जून महिन्यात होईल असे तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार यांनी भूमिपूजन सोहळ्यात घोषित केले होते मात्र नगर परीषद  स्थायी समिती सभेत पुतळा बनविण्याचा ठेका औरंगाबाद येथील शिल्पकाराला देण्यात आला होता मात्र सदर ठेका अचानकपणे रद्द करून दुसऱ्या शिल्पकारा कडून महाराजांचा पुतळा बनविण्यात यावा यासाठी स्थायी समितीची सभा घेण्याचा निर्णय सत्ताधारी स्थायी समिती सदस्यावर आला आहे याबाबत स्थायी समिती सदस्यांमध्ये  समन्वय नसल्याने स्थायी समिती ची सभा दोन वेळा घेऊन तहकूब करण्याची वेळ आल्याने ही तारीख पुढे जाऊन कदाचित आचारसंहिता लागण्या अगोदर निर्णय  झाला नाही तर  महाराजांचा पुतळ्याचा प्रश्न  प्रलबित राहिल्यास शिवप्रेमी संघटना मध्ये याचे तिव्र पडसाद उमटतील म्हणून अस्मितेच्या विषयावर  नगर परिषदेच्या  स्थायी समिती सदस्यांनी राजकारण न करता  तात्काळ स्थायी समिती 
सदस्यांची सभा लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा साकारण्यासाठी  नगराध्यक्षा  व खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रयत्न करावा. लवकरात लवकर महाराजांच्या पुतळ्या चा निर्णय न झाल्यास शिवप्रेमी व रयत  सेनेच्या वतीने  नगर परिषदेसमोर (आगळे वेगळे ) बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगराध्यक्षा व   सत्ताधारी स्थायी समिती सदस्य व नगरपरिषद जबाबदार रहतील असा ईशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती खासदार उन्मेशदादा पाटील,  उपनगराध्यक्षा न पा चाळीसगाव, राजीवदादा देशमुख गटनेते. कै अनिलदादा देशमुख श वि आ,
संजय रतनसिंग राजपुत गटनेते भाजपा,  पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव,  तहसिलदार चाळीसगाव यांना देण्यात आल्या आहेत.
निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार , जिल्हाअध्यक्ष संजय कापसे ,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड,तालुकाउपाध्यक्ष मुकुंद पवार ,मा शहर अध्यक्ष भाऊसाहेब सोमवंशी,शहर कार्याध्यक्ष सुनिल निंबाळकर,विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष गौरव पाटील,शहरअध्यक्ष अनिकेत शिंदे ,शिक्षक सेनेचे शहरअध्यक्ष सचिन नागमोती , जयदीप पवार,एकनाथ जगताप, वैभव पवार,शुभम पाटील, आदित्य मोरे ,साहिल सूर्यवंशी, कुणाल जाधव,रोहित कुमावत,प्रशांत आसबे ,दिनेश गायकवाड आदिच्या सह्या आहेत 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button