Amalner

उपमुख्याधिकारी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर न प त निदर्शने..

उपमुख्याधिकारी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर न प त निदर्शने..

अमळनेर येथे नगरपरिषदेत आज निदर्शने करण्यात आली. कोपरगाव येथील नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारी यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात येते आली आहे तसेच वरणगाव नगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल
केले होते या दोन्ही घटनांचा निषेध अमळनेर नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी
संघटनांतर्फे व्यक्त करण्यात आला.
कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांवर दाखल खोटे गुन्हे
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मागे घ्यावेत अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, बांधकाम अभियंता संजय चौधरी,आरोग्य निरीक्षक अरविंद
कदम,इंटक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद शर्मा, न प कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी अविनाश संदानशिव यासह असंख्य कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button