प्रतिनिधी सोमनाथ माळी
ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव
येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेली अनेक दिवसापासून कर्मचारी नसल्यामुळे बंद आहे. ग्रामपंचायतीतर्फे वार वार याबाबत तक्रार करुन ही केराची टोपली दाखवली जात आहे.सध्या गावात मुंबई,पुणे येथील अनेक कुटुंब आठ दिवसापासुन गावी आलेली आहेत त्याची फक्त ग्रामपंचायतीतर्फे व आशा सेविका मार्फत यादी बनवली असुन अद्याप आरोग्य विभागातर्फे कुठलीही उपाययोजना अथवा सदर लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारे समुपदेशन केले नाही. ग्रामपंचायतीतर्फे गावात जंतूनाशक फवारणी व जनजागृती करण्यात येत आहे उपकेंद्र गावात असुन आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथेच काम करत असल्याचे सांगतात.
वास्तविक पाहता तीन वर्षांपूर्वी आरोग्य सेविका बने या येथील मुख्यालयात म्हणजेच उपकेंद्रातच राहत असल्याने येथे गरोदर माता तपासणी तसेच महिलाच्या डिलेवरीही येथे होत होत्या परंतु तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लाडे याच्या डॉक्टर पत्नी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून आल्याने व आरोग्य सेविका बने डिलेव्हरी व ईतर आरोग्य उपचारासाठी पारंगत असल्याने व आपल्या डॉक्टर पत्नीचा तान कमी व्हावा यासाठी सोईस्कर पणे आरोग्य सेविका बने यांना शिरसगाव येथे सेवेला बोलावून घेतले तेव्हा पासून आरोग्य सेविका बने मुख्यालयात न रहाता शिरसगाव येथेच वास्तव्य करून आहेत. त्यामुळे ब्राम्हणशेवगे येथील उपकेंद्र धुळ खात पडून आहे. याबत तालुका आरोग्य अधिकारी यांना तक्रार करुनही सोईस्कर पणे टाळाटाळ केली जात आहे. फक्त लसीकरण असले तेव्हाच आरोग्य सेविका बने गावात येतात. सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीतर्फे त्याना मुख्यालयात राहणे बाबत सागितले तर तालुका आरोग्य अधिकारी हेच मला शिरसगाव येथेच काम करा असे सांगितले जाते अस सांगतात.
ब्राम्हणशेवगे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र फक्त आणि फक्त आशा सेविका याच्याच भरवशावर आहे.
तसेच ब्राम्हणशेवगे येथे मलेरिया डॉक्टर आहे किंवा नाही हेच कळत नाही गेले अनेक दिवसापासून मलेरिया डॉक्टर गावात फिरकलेच नाही. ग्रामपंचायतीतर्फे गावात अंडरग्राऊड गटारी झाल्याने साथीच्या रोगाचे प्रमाण कमी असते याची संधी साधून व माझ्याकडे दुसरे गाव आहे अस सागुन मलेरिया डॉक्टर गावात येतच नाही अस ग्रामस्थांच म्हणन आहे.
वास्तविक पाहता कोरोना च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने उपाययोजना करणे गरजेचे असतांना
यागोष्टीकडे गाभिर्याने न पाहता तक्रार करुनही सोईस्कर पणे टाळाटाळ केली जात आहे याला चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी यांचाच आशिर्वाद आहे. या गंभीर प्रकारांची वरिष्ठ स्तरावरुन व लोकप्रतिनिधींनी त्वरीत दखल घेऊन कोरोना च्या पार्श्वभूमीवर उपकेंद्र पुर्ववत सुरू करावे अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चा चे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांनी केली आहे.






