Patiyala

?Breaking News…निर्भया प्रकरण : ‘फाशी नको जन्मठेप द्या’..पवन ची मागणी

?Breaking News

निर्भया प्रकरण :

‘फाशी नको जन्मठेप द्या’

पवन ची मागणी

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौथा दोषी पवन कुमार गुप्ता याने सुप्रीम कोर्टात क्यूरेटीव्ह याचिका दाखल केली आहे.

3 मार्चला होणाऱ्या फाशीपूर्वी पवन गुप्ताने फाशीच्या शिक्षेत बदल करून ती आजन्म कारावास अशी करावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली आहे. पवन गुप्ताचे वकील ए. पी. सिंह यांनी कोर्टात ही माहिती दिली.

येत्या सोमवारी (दि.2) पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीदरम्यान फेटाळण्याची शक्यता आहे. असे न झाल्यास पवनचे वकील या डेथ वॉरन्टला स्थगिती द्यावी अशी मागणी करणार हे नक्की.

पवनच्या क्यूरेटीव्ह याचिकेनंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा कायदेशीर अधिकार अद्याप शिल्लक आहे.

Leave a Reply

Back to top button