फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कासवे तालुका यावल येथे गावठी हातभट्टी दारू पोलिसांकडून उध्वस्त
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : शिवारात फैजपुर पो स्टे हद्दीतील कासवे गावाचे शिवारात तापी नदीच्या पात्रात गावठी हातभट्टीची दारू उध्वस्त करून दारू गळण्याचे साधनासह ,कच्चे रसायन तयार दारू एकूण 21,500/- रु .चे मुद्देमालासह आरोपी नामे-जगन कौतिक तायडे रा .कासवा याचेवर पोस्टे 0048/21 महा. दारूबंदी अधिनियम क.65(फ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात सर्वत्र कोरोना चा संसर्ग वाढत असताना सर्वत्र लॉक डाऊन गंभीर परिस्थिती असताना येथील पोलिस स्टेशन हद्दीतील कासवे शिवारात पाेलिसांना गुप्त माहिती च्या आधारे आज फैजपूर पोलिसांनी गावठी हातभट्टी गावठी दारू गाळप असताना फैजपूर पोलिसांनी सापळा रचून रसायन नष्ट करून आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आज सर्वत्र करोना चा संसर्ग वाढत असताना जिल्ह्यासह फैजपुरात कडक लॉक डाऊन सुरू आहे अशा परिस्थितीत कासवे हे फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीतील या ठिकाणी शिवारात अवैधरीत्या गावठी हातभट्टी दारू गाळण्याचे रसायन पोलिसांकडून नष्ट करण्यात आले ही कार्यवाही फैजपूर विभागाचे पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे तसेच पीएसआय रोहिदास ठोंबरे हेमंत सांगळे हेड कॉन्स्टेबल सुधाकर पाटील उमेश सानप महेश वंजारी विकास सोनवणे पाटील हवालदार किरण चाटे आदींनी ही कारवाई केली






